गोवा खबर:एनसीईआरटी भोपाळद्वारे १८ जून ते २० जून २०२३ या कालावधीत प्रादेशिक शिक्षण संस्था, श्यामला हिल्स, भोपाळ येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडसाठी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने खेळाडूंची निवड केली आहे.
माध्यमिक गटात- नववी ते दहावी इयत्तेत शिकणारे विध्यार्थी- कु. वैदेही शेट्ये, डॉ. के.बी. हेडगेवार हायस्कुल कुजिरा, कु. सहाना एस. नेवगी, श्री शांतादुर्गा हायस्कुल डिचोली, कु. इमा जी. पाटील, सारस्वत विद्यालय, म्हापसा, कु. कोमल डी. कुलाल, सरकारी हायस्कुल नमोशी-गिरी, कु. अमन अप्पाजी नाईक, एजे डी आल्मेडा हायस्कुल फोंडा, कु. दिव्यत्व जल्मी, महात्मा गांधी शताब्दी विद्यालय गावणे, कु. शौर्य भगत, डॉ. के.बी. हेडगेवार हायस्कुल कुजिरा, बांबोळी, कु. अथर्व रामचंद्र नाईक, महात्मा गांधी शताब्दी विद्यालय गावणे.

उच्च प्राथमिक गटात- ६वी ते ८वी इयत्तेत शिकणारे विध्यार्थी- आरिफ खान, दत्ताराम मंत्रवादी मेमोरियल हायस्कुल म्हापसा, कु. आरुष गावकर, अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कुल डिचोली, कु. शौनक एस. बाराझणकर, डॉ. के.बी. हेडगेवार हायस्कुल कुजिरा, कु. गणेश एन. रामदुर्गा, श्री शांतादुर्गा हायस्कुल डिचोली, कु. राही घनशाम गावकर, अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कुल डिचोली,, कु. मनस्वी दास, केंद्रीय विद्यालय क्रमांक १ वास्को, कु. स्वरा सातोस्कर, मांद्रे हायस्कुल आणि कु. मानसी एस. कडोलकर, रोझरी हायस्कुल बांबोळी, या विध्यार्थ्यांची निवड झाली आहे.