गोवा खबर: ‘सेंगोल’चा वापर करून सत्ता हस्तांतरित करण्यासाठी देशात राजेशाही अस्तित्वात नाही, हा अधिकार कर्नाटकातील लोकांना भाजपला घरी पाठवून दाखविला आहे असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मंगळवारी म्हटले.
मडगाव येथे ‘घटकराज्य दिन’ सोहळ्यात ते बोलत होते. माजी खासदार एदुआर्द फालेरो, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार अॅड. कार्लूस फॅरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, अमरनाथ पणजीकर, महिला प्रमुख बीना नाईक, कॅप्टन विरिएटो फर्नाडीस, जिल्हाध्यक्ष वीरेन शिरोडकर आणि सावियो डिसिल्वा, सेवादल प्रमुख जयदेव प्रभुगावकर, नौशाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस नेत्यांनी एदुआर्द फालेरो यांना घटकराज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेले चांगले संबंध वापरून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घटकराज्याचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हा अभिमानाचा क्षण आहे असे अमित पाटकर म्हणाले.
अमित पाटकर म्हणाले की काँग्रेस नेते खासदार फ्रन्सिस सार्दिन, माजी खासदार एदुआर्द फालेरो आणि स्व. शांताराम नाईक यांनी केंद्रीय नेत्यांसह राज्यत्वासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबत बोलताना पाटकर म्हणाले, “सेंगोलने अधिकार हस्तांतरित करण्यासाठी देशात राजेशाही नाही, हा अधिकार कर्नाटकातील लोकांनी वापरून भाजपला घरची वाट दाखवली आहे. मोदींनी नेहमीच लोकांना दिशाभूल करण्याचा आणि नको असलेल्या गोष्टींनी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे,’’ असे ते म्हणाले.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरावून घेतल्याबद्दल पाटकर यांनी टीका केली. ते म्हणाले, “सेंगोल वापरून सत्ता हस्तांतरित करणारे मोदी हे राजा नाहीत,’’ असे ते म्हणाले.
पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे राज्याला पोर्तुगिजां पासून मुक्ती मिळवण्यासाठी विलंब लागला असे भाजपने चुकीचे विधान केले आहे. “हे चुकीचे आहे आणि ते चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे ते म्हणाले.
‘भाजप पक्ष धर्म, भाषा आणि इतर मुद्द्यांवर लोकांमध्ये फूट पाडत आहे. काळा पैसा परत आणण्यात मोदी अयशस्वी ठरले आणि दिलेल्या सर्व आश्वासनांमध्ये त्यांनी यू टर्न घेतला आहे. त्यांच्या जुमल्यांचा पर्दाफाश करण्याची आणि आपल्या देशाचे रक्षण करण्याची वेळ आली आहे,” असे पाटकर म्हणाले.
गोव्याची संस्कृती आणि शांतता जपण्यासाठी लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
एदुआर्द फालेरो म्हणाले की, मुक्तीनंतर गोव्यात खूप विकास झाला आहे. “ओपिनियन पोल दरम्यान लोकांनी आमच्या अस्मितायेचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि विलीनीकरणाच्या विरोधात मतदान केले,” असे ते म्हणाले.
फ्रान्सिस सार्दिन म्हणाले की, गोव्यासाठी घटकराज्याचा दीन हा मोठा आहे. “आम्ही ओपिनियन पोल दरम्यान विलीनीकरणाच्या विरोधात लढलो आणि आमची ओळख जपली. पुढे राजीव गांधींच्या प्रयत्नांनी आमची मातृभाषा कोकणी भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आम्हाला घटकराज्याचा दर्जाही मिळाला,” असे सार्दिन म्हणाले.
कर्नाटकातील स्टील प्लांटची तहान भागवण्यासाठी म्हादई नदी वळवल्याबद्दल त्यांनी भाजपवर टीका केली. “त्यांना स्टील प्लांटसाठी पाणी हवे आहे आणि म्हणून ते पाणी वळवत आहेत,’’ असे ते म्हणाले.
अॅड. कालूस फॅरेरा म्हणाले की, काँग्रेसने पोर्तुगिजांपासून मुक्ती आणि घटकराज्याचा दर्जा मिळवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. “भाजप आमच्या देशात धर्म, प्रादेशिक धर्तीवर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते मणिपूरचे विभाजन करण्याचाही प्रयत्न करत आहेत,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले, “आपण संघटित होऊन आपल्या राज्याचे रक्षण केले पाहिजे.
एम के शेख, बीना नाईक, विरियटो फर्नांडिस आदींची भाषणे झाली. अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले. एम के शेख यांनी स्वागत केले, तर सावियो डिसिल्वा यांनी आभार मानले.