Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून मान्सून पूर्व तयारीचा आढावा

Published

on

Spread the love

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या बैठकीत महसूल मंत्री तथा गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे उपाध्यक्ष श्री आतानासियो मोन्सेरात यांच्याउपस्थितीत लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आपत्ती प्रतिरोधक गोव्यासाठी योग्य तयारी आणि उपाययोजना राबविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे तसेच डीडीएमएचे इतर सदस्य आणि सर्व संबंधित खात्यांतील सदस्य यावेळी उपस्थित होते.

गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या तसेच एसडीएमएच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढाव घेण्यासाठी वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात येते.

 गोवा हे किनारपट्टीचे राज्य असल्याने ते नैसर्गिक तसेच मानवी आपत्तींना असुरक्षित आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी, कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आणि लवकर तयारी करणे आवश्यक आहे असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आपत्तीचा अंदाज बांधणे हे आपल्या हातात नसल्यामुळे आपण आपत्तीचा अंदाज बांधू शकत नाही, परंतु आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन, प्रसंगांना तोंड देण्याची तयारी केल्यास जीवित आणि मालमत्तेचे नुकसान वाचण्यास मदत होईल असे ते म्हणाले. अलिकडच्या काळात गोव्याला २०२१ मध्ये चक्रीवादळ आणि पूर आणि औद्योगिक युनिटच्या इतर मोठ्या आगीच्या घटनांचा सामना करावा लागला होता, ज्याचा सामना करण्यासाठी आम्ही केवळ आमच्या तयारीने प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकलो असे त्यांनी सांगितले. आपत्ती असुरक्षितता लक्षात घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की आपण सतर्क राहणे आवश्यक आहे आणि सर्व खात्यांमध्ये योग्य समन्वय आणि सहकार्याचे आवाहन त्यांनी केले.

       मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या सक्रिय सहकार्याची मागणी केली त्याच्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाचा उद्देश पूर्ण होणार नाही आणि जे लोक स्वेच्छेने एसडीएमए सोबत काम करण्यास इच्छुक आहेत त्यांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले. त्यांनी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित आपदा मित्र आणि आपदा सखींना नियमितपणे नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या सेवांचा वापर करता येईल असे ते म्हणाले. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खात्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सचेत नैसर्गिक आपत्ती अलर्ट पोर्ट लोकांना आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमापांबद्दल माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

महसूल मंत्री श्री आतानासियो मोन्सेरात यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आणि दोषारोपाचा खेळ खपवून घेतला जाणार नाही असे सांगितले. या पावसाळ्यात एसडीएमए आणि डीडीएमए आणि संबंधित खात्यांनी आवश्यक तयारी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि इतर भागधारकांच्या उपस्थितीचे कौतुक केले. सरकारने राज्य आणि जिल्हा स्तरावर घटना प्रतिसाद प्रणाली अधिसूचित केली आहे, समुद्रात मोठ्या प्रमाणावर बचाव कार्यासाठी स्थानिक आकस्मिक योजना तसेच वार्षिक दळणवळण योजना पूर्ण केल्या आहेत आणि महत्वाची कागदपत्रे जारी करणे हा सरकारचा सुरक्षित गोव्यासाठी पूर्वतयारी आणि कमी करण्याच्या उपायांसाठी एक पुढाकार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

मुख्य सचिव श्री पुनीतकुमार गोयल आयएएस; महसूल सचिव श्री संदिप जॅकिस आयएएस; उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती. मामू हागे आयएएस;  माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री दीपक बांदेकर; डब्लुआरडीचे मुख्य अभियंता श्री प्रमोद बदामी; जिल्हा संचालन व योजना अधिकारी तटरक्षक दल, कॉ. आशिष खोसला; पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता इतर खात्यांचे प्रमुख, राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

अवर सचिव श्रीमती सपना बांदोडकर यांनी गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांने हाती घेतलेल्या उपाययोजनांचे आणि पूर्व तयारीवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले.