Connect with us

गोवा खबर

सांत आंद्रेतील पोटार जुवारी रस्त्याचे होणार डांबरीकरण

Published

on

Spread the love
गोवा खबर:सांत आंद्रे मतदारसंघातील पोटार जुवारी इथल्या रस्त्याचे डांबरीकरण होणार असून, त्याचे उद्घाटन सोमवारी आमदार विरेश बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
बऱ्याच वर्षापासून हा रस्ता करावा अशी मागणी केली होती. सुमारे बारा वर्षापूर्वी हा रस्ता करण्यात आला होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्यानुसार आता रस्त्याचे लवकरच डांबरीकरण होणार आहे.
या रस्त्याच्या उद्घटनादरम्यान  आमदार विरेश बोरकर यांनी पीडब्लूडी खात्याच्या अधिकाऱ्यांचे, पंच तसेच ग्रामस्थांचे आभार मानले. मतदारसंघातील जनतेने अशाच प्रकारे विकासकामे करण्यात सहभागी व्हावे असेही बोरकर म्हणाले.
या रस्त्याचे डांबरीकरणामुळे नागरिकांना रस्त्याने चालताना वाहनांना होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे ग्रामस्थही आनंदी व मतदारसंघात विकासकामे होत असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.