गोवा खबर: पारोडा पंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच पॉलिना फर्नांडिस, उपसरपंच शैलेश जोतकर आणि पंचायत सदस्य जोकीम डायस
आणि राजश्री गावकर यांनी आज कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची भेट घेतली आणि आलेमाव यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा घेऊन लोकांसाठी काम करण्याचे आश्वासन त्यांना दिले.
पारोडा पंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी माझे पूर्ण सहकार्य व पाठबळ पंचायतीला असेल. चारही पंच सदस्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. मला खात्री आहे की ते सर्वजण पंचायतीच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करतील, असे युरी आलेमाव म्हणाले.
नवीन पॅनेलने पारोडा पंचायत ताब्यात घेतल्याचा मला आनंद आहे. त्यांचे सर्व लोक कल्याणाभिमुख प्रस्ताव तात्काळ मंजूर होतील आणि पारोडा येथील लोकांना लवकरच विकासाचा बदल जाणवेल याची मी खात्री देतो असे युरी आलेमाव पूढे म्हणाले.
सरपंच पॉलिना फर्नांडिस यांनी सांगितले की, चारही पंचायत सदस्य एकत्रितपणे निर्णय घेतील आणि कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली एकत्र राहतील.
आमचे आमदार युरी आलेमाव यांची कामगिरी संपूर्ण गोव्याने पाहिली आहे. लोकांचा नवा आवाज म्हणून ते उदयास आले आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि पारोडा आणि संपूर्ण कुंकळ्ळी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करू, असे उपसरपंच शैलेश जोतकर यांनी सांगितले.