Connect with us

गोवा खबर

हिंदू सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी संघटित होण्याची गरज : टी. राजासिंह, आमदार, तेलंगाना

Published

on

Spread the love
‘जिहादींच्या सावटाखाली हिंदूंचे सण कधीपर्यंत ?’ या विषयावर विशेष संवाद !

 

गोवा खबर:आज मुसलमान रस्त्यावर नमाज पडू शकतातमात्र श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यादिवशी हिंदूंनी साधी मिरवणूक काढलीतरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेतदेशात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केल्या जाणार्‍या दंगली आणि इतर हिंसक घटना पाहता त्या रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी आता संघटित होण्याची गरज आहेअसे प्रतिपादन तेलंगाना येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टीराजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिहादींच्या सावटाखाली हिंदूंचे सण कधीपर्यंत?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

     या वेळी ‘विश्व हिंदु परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ता श्रीविनोद बंसल म्हणाले कीश्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या सणांच्या वेळी हिंदूंच्या मिरवणूकींवर पूर्वीही हल्ले व्हायचे आणि आताही हे सुरूच आहेमात्र आता हिंदू प्रतिकार करू लागला आहेबंगालबिहारझारखंडछत्तीसगडदिल्ली आदी राज्यांत षड्यंत्रपूर्वक पोलीसप्रशासनाकडून हिंदूंना मिरवणुका काढण्यास रोखले जात आहेया मिरवणुकांत धर्मांधांच्या अत्याचाराला लक्ष्य ठरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवून त्यांना अटक केली जात आहे आणि खरे दोषी मात्र मोकाट फिरत आहेतयामध्ये धर्मांधांचे समर्थन करणार्‍या संघटनाराजकीय नेते आणि सोशल मीडियावर कार्यरत असलेले तथाकथित ‘फॅक्ट चेकर’ यांचे एकमेकांशी परस्पर संबध आहेतया सर्वांची यंत्रणा मोडून काढण्याची गरज आहे.

सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक श्रीअभय वर्तक म्हणाले कीया वर्षीही हिंदू सणांच्या वेळी दंगली घडवून आणल्या गेल्यायामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) चा सहभाग होताआज मुसलमानांची लोकसंख्या देशात 25 कोटी झाली असतांनाही त्यांना अल्पसंख्य म्हणून संबोधले जाणेही हिंदूंच्या डोळ्यात ‘धूळफेक’ करण्याचा प्रकार आहेआज देशात घडणार्‍या विविध घटनांतून भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ बनवण्याचा प्रयत्न चालू आहेआपला देश दुसर्‍या विभाजनाकडे जातो आहेही वास्तविकता डोळ्यासमोर दिसत आहेहिंदू संघटित न झाल्यास हिंदू विनाशाकडे जातीलहे टाळण्यासाठी हिंदूंनी आपल्यासमोरील आव्हाने ओळखून जातपातसंघटनापद आदी सर्व बाजूला ठेऊन आता हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हायला हवे.

      या वेळी पश्चिम बंगाल येथील ‘आत्मदीप’ या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता प्रसून मैत्र म्हणाले कीपश्चिम बंगालमध्ये मुसलमान समाजाने काहीही केलेतरी कायदेशीरदृष्टया योग्य ठरवले जाते आणि त्याचे समर्थन केले जातेअशी येथील राजकीय पक्षाची मानसिकता आहेआज हिंदूंना दुर्बल समजून कायद्याचा धाक दाखवला जातोभगवान श्रीकृष्णाचा शांतीचा प्रस्ताव कौरवांनी धुडकावून लावल्यावर शेवटी पांडवांना युद्ध करावेच लागलेहिंदूंनी सुद्धा आता केवळ वार्तालापाच्या भूमिकेत न जाता काळाची आवश्यकता ओळखून प्रतिकार करायला शिकायला हवे.