Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना ईस्टरच्या शुभ प्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, ईस्टर हा जगातील सर्व लोकांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. ईस्टर हा पवित्र दिवस असून भगवान येशू ख्रिश्तानी मानवतेसाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतिक आहे. येशू ख्रिश्तांना वधस्तंभावर मारणे आणि त्याचे पुनरूत्थान होणे हे वाईट प्रवृतीवर सत्याच्या विजयाचे प्रकटीकरण आहे.

आपल्या संदेशात राज्यपाल पुढे म्हणतात,सध्याच्या काळात धर्म, जात-पात याचा भेदभाव न करता क्षमा आणि बंधुता याच्यापेक्षा शिकण्यासारखा दुसरा धडा नाही.

या पवित्र आणि शुभ प्रसंगी आम्ही सर्वानी शांतता, सलोखा आणि बंधुतेच्या आदर्श तत्वांचे पालन करूया. या वर्षाचा ईस्टर सण लोकांमध्ये शांतता, आनंद आणि एकता घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.