Connect with us

गोवा खबर

कोविड योग्य वर्तन ठेवण्याचे आरोग्य संचालनालयाचे आवाहन

Published

on

Spread the love

 गोवा खबर:गोवा राज्यात तसेच भारतातील इतर राज्यांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. १९ मार्च २०२३ रोजीपर्यंत राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०३ एवढी आहे, असे आरोग्य संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे. राज्यात एच३एन२ चे दोन रुग्ण सापडले असून त्यांचे आरोग्य ठीक आहे असे कळविण्यात आले आहे.

मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोवा राज्यात कोविड-१९ व इन्फ्लुएन्झा साठी निरीक्षण केले जात आहे.

 

जनतेने पुढील गोष्टींचे पालन करावे असा सल्ला आरोग्य संचालनालयाने दिला आहे : वैयक्तिक स्वच्छता राखा; वारंवार साबणाने हात धुवा; श्वसनाचे नियम पाळा – शक्य होईल तितके खोकताना किंवा शिंकताना तोंड झाका, काखेत शिंका; आजारी असलेल्या किंवा खोकला, वाहणारे नाक इ. लक्षणे असणार्‍या लोकांशी जवळचा संपर्क टाळा; खोकला, वाहणारे नाक इ. श्वसनाची लक्षणे असल्यास मास्क वापरा; गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा; आजारी मुलांनी शाळेत जाऊ नये व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; फ्लूसदृश लक्षणे आढळल्यास वयस्कर व इतर आजार असलेल्या लोकांनी नजीकच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी.

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत  असेही आरोग्य संचालनालयाने म्हटले आहे.