Connect with us

गोवा खबर

बहुपीके घेण्याचे जलस्रोत मंत्र्यांचे शेतकर्‍यांना आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर: जलस्रोत मंत्री  सुभाष शिरोडकर यांनी चिंचीणी येथे “पेरा व उगवा पर्यावरण स्वच्छ व हरित बनवा” या प्रकल्पाची सुरूवात केली.

यावेळी श्री. शिरोडकर यांनी २० हेक्टर भातशेती लागवडीखाली आणण्याच्या शेतकरी संघटना व कोमुनिदाद यांच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक केले. संपूर्ण गोवा राज्यासाठी नोव्हेंबर महिन्यात कालव्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे वचन यावेळी दिले.

यामुळे शेतकर्‍यांना बहुपीके घेण्याव्यतिरिक्त अधिक जमीन लागवडीखाली आणण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. स्थानिकांनी आणलेल्या हिरवाईमुळे मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन होण्यास मदत झाली, त्यामुळे त्यांनी स्थानिकांचे कौतुक केले. लागवडीच्या उपक्रमांमध्ये चिंचोणे गोव्यातील आदर्श गाव बनवावा असे आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केले.

 सुमारे तीन दशकांसाठी पडीक असलेल्या शेतामध्ये उत्पन्न घेण्याच्या कार्यक्रमाचेही त्यांनी उद्घाटन केले. चिंचीणी कृषी क्लबच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व जलस्रोत खात्याच्या पाठिंब्यामुळे ५० एकर जमीन लागवडीखाली आणली गेली, असे ते म्हणाले.

 सुमारे २०० शेतकर्‍यांना कालव्याचे पाणी देण्याचे मुक्त साहाय्य दिल्यामुळे चिंचीणी शेतकरी संघटनेने मंत्र्यांना वॉटर मॅन ऑफ गोवा असे संबोधले.

सुरुवातीला, ऍड. आग्नेल फुर्तादो यांनी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

आमदार श्री. क्रुझ सिल्वा, चिंचीणी-देवसू ग्रामपंचायतीचे सरपंच वेलेंटिनो बरेटो, डॉन बॉस्को सोसायटीचे कृषी प्रकल्प संचालक फा. जॉर्ज क्वाद्रुस, चिंचीणी कृषी क्लबचे अध्यक्ष आग्नेल फुर्तादो यावेळी उपस्थित होते.

आमदार श्री. क्रुझ सिल्वा यांनी यावेळी विचार व्यक्त केले व शेतकर्‍यांना आपला पाठिंबा दर्शविला.