Connect with us

गोवा खबर

अभाविप उत्तर गोवा तर्फे गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व वाढवण्यासाठी “युवा नेतृत्व सम्मेलन” आयोजन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर गोवा ने एजी केनी हॉल, सारस्वत महाविद्यालय म्हापसा येथे युवकांना सुशासन आणि नेतृत्वासाठी प्रेरणा देण्यासाठी युवा नेते नेतृत्व सम्मेलन आयोजन केले होते. या कार्यक्रमात उत्तर गोव्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
याप्रसंगी बोलताना संजय मुळवी यांनी “गोव्यातील स्टार्ट-अप आणि व्यवसायाच्या संधी” याविषयी संबोधन केले आणि राज्यातील तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले.
अ‍ॅड. नरेंद्र सवाईकर यांनी ‘सुशासनात तरुणांची भूमिका’ या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले. एक चांगला समाज निर्माण करण्यात तरुणांची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि ते सुशासनात कसे योगदान देऊ शकतात यावर त्यांनी चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक व्यवहारात सहभागी होण्यासाठी, पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित केले.
अभाविप चे राष्ट्रीय महामंत्री श्री. याज्ञवलक्य शुक्ल जी यांच्या हस्ते उत्तर गोव्यातील सगळ्या महाविद्यालयांचे ‘जी. एस’ व संपूर्ण छात्र संघाचा सत्कार केला.
राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी अभाविपच्या कार्याबद्दल सांगितले आणि तरुणांना नेता म्हणून उदयास येण्याची प्रेरणा दिली. त्यांनी नेतृत्वाचे महत्त्व, राष्ट्राचे भविष्य घडवण्यात तरुणांची भूमिका आणि अभाविप जबाबदार नेते तयार करण्यासाठी कसे कार्य करत आहे यावर जोर दिला.
सम्मेलन मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुकूल नविन गोवा विद्यापीठ कायदा बनवावा हा प्रस्ताव गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर यांनी मांडला व विद्यार्थ्यांनी ठराव पारित केले. एक चांगले भविष्य घडवण्यासाठी आणि सर्वांना समान संधी सुनिश्चित करण्यासाठी शिक्षणाच्या महत्त्वावर जोर देण्याचा या ठरावांचा उद्देश होता. उपस्थितांना आपापल्या संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यात आले.