गोवा खबर:गोवा सरकारच्या समाज कल्याण संचालनालयाच्यावतीने “मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजना” राबविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजनेखाली तिरुपतीला जाण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्याने समाज कल्याण संचालनालयाने पुढील आदेशापर्यंत या योजनेखाली तिरुपती देव दर्शन यात्रेसाठी अर्ज स्वीकारण्याचे स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याची लोकांनी नोंद घ्यावी.