Connect with us

गोवा खबर

केंद्रिय औध्योगिक सुरक्षा दलात भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Published

on

Spread the love

 गोवा खबर: केंद्रिय औध्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल/ट्रेड्समनची तात्पुरती पदे भरण्यासाठी पात्र पुरूष आणि महिला भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. या पदांसाठींचा वेतन स्तर-३ (रु. २१,७००-६९,१००/-) असा आहे तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता लागू राहील.  त्यांच्या नियुक्तीप्रमाणे सीआयएसएफ कायदा आणि नियम त्याचप्रमाणे दलाच्या इतर  सदस्यांप्रमाणे केंद्रिय नागरी सेवा नियम लागू असेल.  तसेच १ जानेवारी २०४४ रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या निवृत्ती वेतन प्रणालीप्रमाणे पेन्शन लाभ मिळेल.

भरती प्रक्रियेत  शारीरिक चाचणी,  आवश्यक दाखल्यांची तपासणी, ओएमआर आधारित /संगणक आधारित लेखी परीक्षा आणि वैध्यकिय तपासणीचा समावेश असेल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २०  डिसेंबर २०२२ रात्री ११.०० वाजेपर्यंत आहे. अर्ज फक्त ‘ऑनलाइन’ पद्दतीने स्वीकारले जातील.  इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.cisfrectt.in  या वेबसाईटवर भेट द्यावी.

Continue Reading