Connect with us

गोवा खबर

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडिअन पॅनोरमाअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा

Published

on

Spread the love


यंदाच्या इफ्फीमध्ये 25 फिचर आणि 20 नॉन फिचर फिल्म दाखवल्या जाणार.

फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून ‘हादीनेलेंतू’ या कन्नड चित्रपटाची निवड.

नॉन फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून ‘द शो मस्ट गो ऑन’ या इंग्रजी चित्रपटाची निवड

धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे हा मुख्य प्रवाहातील आणि फ्रेम, शेर शिवराज, एकदा काय झालं हे फिचर फिल्म  तर रेखा या मराठी नॉन फिचर फिल्मचा समावेश

 

 गोवा खबर:भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात होत असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हे निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीनं (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंडियन पॅनोरमाचं आयोजन केलं जातं. इंडियन पॅनोरमाअंतर्गत आखलेल्या नियमांमध्ये नमूद अटी आणि कार्यपद्धतीनुसार सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असतील अशा फिचर नॉन फिचर फिल्म्सची निवड करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.

‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड संपूर्ण भारतभरतातल्या सिनेजगतातील नामवंत व्यक्तींच्या मार्फत केली जाते. यात फिचर फिल्म्ससाठी एकूण बारा सदस्य तर नॉन-फिचर फिल्म्ससाठी सहा सदस्य ज्युरी म्हणून काम पाहतात. हे सर्व ज्युरी, सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वातील निवड समिती चित्रपटांची निवड करते. आपल्या वैयक्तिक ज्ञान कौशल्याचा वापर करून, ही नामवंत व्यक्तिमत्वांची निवड समिती एकसमान योगदान देत, एकमतानं चित्रपटांची निवड करते. त्यातूनच इंडिअन पॅनोरमा अंतर्गतच्या विविध वर्गवारीत सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाते.

फिचर फिल्म्स : यंदाच्या बारा सदस्यांचा समावेश असलेल्या या फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, निवड समितीचे अध्यक्ष, प्रख्यात दिग्दर्शक आणि संपादक श्री विनोद गणात्रा यांनी केलं. या बारा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत.

श्री. ए. कार्तिक राजा; सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री. आनंद ज्योती; संगीतकार, लेखक आणि चित्रपट निर्मातेश्रीमती डॉ. अनुराधा सिंह; चित्रपट निर्मात्या आणि संपादकश्री. अशोक कश्यप; निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री एनुमुला प्रेमराज; दिग्दर्शक आणि पटकथालेखकश्रीमती गीता एम गुरप्पा; ध्वनी संयोजिक / साऊंड इंजिनीअरश्री. इमो सिंग; निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकश्री. जुगल देबाटा; निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री. सैलेश दवे; निर्माताश्री. शिबू जी सुशेलान; निर्माताश्री. व्ही. एन. आदित्य; निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखकश्री. विष्णू शर्मा; लेखक आणि चित्रपट समीक्षक

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 354 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 25 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेले हे 25 चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहुरंगी आणि विविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट आहेत.

इंडियन पॅनोरमा 2022 अंतर्गत फिचर फिल्मस वर्गवारीसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे :

 

S.No. Title of the Film Language Director
Mahananda Bengali Arindam Sil
Three of Us Hindi Avinash Arun Dhaware
The Storyteller Hindi Ananth Narayan Mahadevan
Major Hindi Sashi Kiran Tikka
Siya Hindi Manish Mundra
Dhabari Quruvi Irula Priyanandanan
Hadinelentu Kannada Prithvi Konanur
Naanu Kusuma Kannada Krishne  Gowda
Lotus Blooms Maithili Pratik Sharma
Ariyippu Malayalam Mahesh Narayanan
Saudi Vellakka CC.225/2009 Malayalam Tharun Moorthy
Frame Marathi Vikram Patwardhan
Sher Shivraj Marathi Digpal Lanjekar
Ekda Kaay Zala Marathi Dr. Saleel Shrinivas Kulkarni
Pratikshya Oriya Anupam Patnaik
Kurangu Pedal Tamil Kamalakannan S
Kida Tamil RA.Venkat
Jai Bhim Tamil Tha. Se. Gnanavel
Cinema Bandi Telugu Kandregula Praveen
Kudhiram Bose Telugu Vidya Sagar Raju

 

Mainstream Cinema Section

 

The Kashmir Files Hindi Vivek Ranjan Agnihotri
RRR (Roudram Ranam Rudhiram) Telugu S S Rajamouli
Tonic Bengali Avijit Sen
Akhanda Telugu Boyapati Srinivasa Rao
Dharmveer….Mukkam Post Thane Marathi Pravin Vitthal Tarde

 

इंडियन पॅनोरमा 2022 च्या फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं श्री पृथ्वी कोनानूर दिग्दर्शित ‘हादीनेलेंतू’ या कन्नड चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.

 

नॉन फिचर फिल्म्स

यंदाच्या सहा सदस्यांचा समावेश असलेल्या नॉन फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, या निवडसमीतीचे अध्यक्ष प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते, श्री ओइनम डोरेन यांनी केलं. या सहा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत :

श्री चंद्रशेखर ए; चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि माध्यम शिक्षणतज्ञश्री हरीश भीमानी, चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, निवेदक आणि, अभिनेताश्री मनीष सैनी; चित्रपट निर्माते, लेखक आणि संपादकश्री. पी. उमेश नाईक; चित्रपट निर्माते आणि पत्रकारश्री राकेश मित्तल; चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि लेखकश्री संस्कार देसाई; चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, शिक्षणतज्ज्ञ

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या नॉन फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 242 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेल्या या 20 चित्रपटांमधून भारतातील उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या एखादा विषयाचे ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणे, त्या त्या विषयांसाठी संशोधन करणे आणि त्याचवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासंबंधीच्या क्षमतेचे दर्शन घडते.

इंडियन पॅनोरमा 2022 अंतर्गत नॉन फिचर फिल्म्स वर्गवारीत निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे:

 

S.No. Title of the Film Language Director
Pataal-Tee Bhotiya Mukund Narayan   &

Santosh Singh

Taangh English Bani Singh
Ayushman English Jacob Varghese
Other Ray: Art of Satyajit Ray English Jaydip Mukherjee
Gurujana English Sudipto Sen
Hatibondhu English Kripal Kalita
Clinton English Prithviraj Das Gupta
The Show Must Go On English Divya Cowasji
Khajuraho, Anand Aur Mukti Hindi Ramji Om & Deepika Kothari
Vibhajan Ki Vibhishka Unkahi Kahaniyan Hindi Hitesh Shankar
Fatima Hindi Sourabh Kanti Dutta
Chhu Med Na Yul Med Hindi Munmun Dhalaria
Before I Die Hindi Nakul Dev
Madhyantara Kannada Basti Dinesh Shenoy
Wagro Konkani Sainath S Uskaikar
Veetilekku Malayalam Akhil Dev M
Beyond Blast Manipuri Saikhom Ratan
Rekha Marathi Shekhar Bapu Rankhambe
Yaanam Sanskrit Vinod Mankara
Little Wings Tamil Naveenkumar Muthaiah

 

इंडियन पॅनोरमा 2022 च्या नॉन फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं कुमारी दिव्या कोवासजी दिग्दर्शित ‘द शो मस्ट गो ऑन’ या इंग्रजी चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.

भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशासह भारतीय चित्रपटांना चालना देण्याच्या उद्देशानं, 1978 भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गतच (इफ्फी) इंडियन पॅनोरमा हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्या त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट दाखवण्यासाठी इंडियन पॅनोरमा वचनबद्ध आहे, आणि इंडियन पॅनोरमाच्या स्थापनेपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे. इंडियन पॅनोरमा विभागासाठी चित्रपट निवडीमागे चित्रपट कलेच्या प्रसाराचा मुख्य उद्देश आहे, त्यामुळेच या विभागा अंतर्गत निवडलेले चित्रपट, भारत आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांच्यावेळी आयोजित भारतीय चित्रपट सप्ताहात, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या अधिकृत चौकटीपलिकडे आयोजित होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सवांमध्ये ना-नफा तत्वावर दाखवले जातात.