Connect with us

गोवा खबर

नव्या हंगामाच्या धडाकेबाज सुरुवातीसाठी एफसी गोवा उत्सुक; आयएसएलच्या सलामीला आज ईस्ट बंगाल एफसीशी गाठ

Published

on

Spread the love

 

 

 गोवा खबर: आयएसएलच्या नव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात बुधवारी एफसी गोवाचा सामना ईस्ट बंगाल एफसीशी पडेल. या लढतीद्वारे त्यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

 

गोवा संघ हा आयएसएलमधील शेवटच्या सामना खेळला तेव्हापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तंतोतंत सांगायचे तर, गोवा संघ बुधवारी मैदानात उतरतील, तेव्हा त्या घटनेला ९५० दिवस होतील. कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर होणाऱ्या सामन्यात कार्लोस पेना यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघ मोठय़ा विजयासाठी उत्सुक आहे.

 

रेड आणि गोल्ड अशी ओळख असलेल्या ईस्ट बंगाल एफसी संघाची अपयशी सुरुवात झाली. त्यांना शुक्रवारच्या ओपनिंग सामन्यात केरला ब्लास्टरकडून 1-3 असा पराभव पाहावा लागला. होमग्राऊंडवर होणार्‍या एफसी गोवाविरुद्धच्या लढतीद्वारे यजमान विजयी मार्गावर परतण्यासाठी आतुर आहेत. घरच्या मैदानावर घरच्या पाठीराख्यांना खुश करण्यास उत्सुक आहेत.

प्रशिक्षक पेना यांचीही कसोटी

नव्या हंगामात एफसी गोवाचे प्रशिक्षक पेना यांचीही कसोटी लागेल. मागील हंगामात प्रतिनिधित्व केलेल्या पेना यांच्याकडे यंदा कोच पदाची धुरा आहे.

 

आमचा संघ लढवय्या आहे. तशी छाप आम्ही यंदाच्या पाडू, असा विश्वास प्रशिक्षक  पेना यांनी व्यक्त केला आहे. नव्या हंगामात नव्या जबाबदारीमुळे मी खूप आनंदी आहे. हंगामपूर्व  शिबिरात आम्ही प्रत्येक खेळाडूवर खूप मेहनत घेतली आहे. त्यातील सातत्य संपूर्ण हंगामात राखण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे पेना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ईस्ट बंगाल संघाला त्यांचा पहिला सामना गमवावा लागला. परंतु ते आज ते त्यांच्याच चाहत्यांसमोर खेळणार आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. त्यामुळे सलामीच्या लढतीत आमच्यासमोर खेळ उंचावण्याचे मोठे आव्हान असेल. मात्र विजयासाठी मैदानावर उतरू, असा विश्वास प्रशिक्षक पेना यांनी व्यक्त केला.

क्लब समोरील आव्हाने

प्रत्येक हंगाम हा एफसी गोवासाठी नवी आशा  घेऊन येतो. मागील हंगाम त्यांच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. त्यांना नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आजवरच्या आयएसएलच्या आठ पैकी सहा हंगामात एफसी गोवाने सहा  वेळा प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे.

 

यंदाच्या हंगामासाठी एफसी गोवा संघाने सात नवे खेळाडू करारबद्ध केले. त्यात मुख्य प्रशिक्षक पेना तसेच पाच परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. नवे खेळाडू आणि नवे प्रशिक्षक यांचा समावेश असलेला नव्या लुकचा एफसी गोवा संघ पुन्हा एकदा प्ले-ऑफ फेरी गाठेल, असा विश्वास चाहत्यांना वाटतो.

 

एफसी गोवा संघाचा यंदाचा आयएसएल हंगाम हा तीन सलग away सामन्यांनी सुरू होत आहे. त्यांचा पहिला होम सामना 3 नोव्हेंबरला गोवा येथे होईल.

 

एफसी गोवा संघ मागील अपयश पुसून टाकण्यासाठी आतुर आहे. मात्र संपूर्ण संघ यंदाच्या हंगामाकडे एक आव्हान म्हणून पाहत आहे. त्याची सुरुवात ईस्ट बंगाल विरुद्धच्या (12 ऑक्टोबर) लढतीने होईल, असे अनुभवी मिडफिल्डर ग्वारोटक्सेना याचे म्हणणे आहे.