गोवा खबर: एफसी गोवा संघ हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 हंगामात पूर्णपणे त्वेषाने आणि जिंकण्यासाठी खेळेल, असा विश्वास प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या हंगामात एफसी गोवाची सलामीची लढत 12 ऑक्टोबर रोजी ईस्ट बंगाल एफसीशी होईल. गोवा संघ हा आयएसएलमधील शेवटच्या सामना खेळला तेव्हापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तंतोतंत सांगायचे तर, गोवा संघ बुधवारी मैदानात उतरतील, तेव्हा त्या घटनेला ९५० दिवस होतील.

कार्लोस पेना, जे तेव्हा खेळण्याच्या संघाचा एक भाग होते, आता क्लबचे मुख्य प्रशिक्षक म्हणून परत आले आहेत. आमचा संघ लढवय्या आहे. तशी छाप आम्ही यंदाच्या पाडू. मागील हंगामात आम्ही नवव्या स्थानी होतो. मात्र, आयएसएल हंगामात टॉपचे स्थान मिळवू, असे प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी म्हटले आहे.
‘कोलकात्यात पूर्व बंगालचा सामना करणे आव्हान असेल‘
ईस्ट बंगालला यंदाच्या हंगामात केरला ब्लास्टर्सच्या हातून पराभूत व्हावे लागले तरी एफसी गोवा विरुद्धचा सामना हा त्यांचा घरच्या चाहत्यांसमोरील त्यांचा यंदाच्या हंगामातील पहिला हिरो इंडियन सुपर लीग सामना आहे. त्यामुळे पेना यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाचा कस लागेल.
“त्यांना त्यांचा पहिला सामना गमवावा लागला असेल, परंतु ते त्यांच्याच चाहत्यांसमोर खेळणार आहेत. ही वस्तुस्थिती त्यांना मजबूत बनवणारे एक कारण आहे. हे आमच्यासाठी आव्हान असेल, पण आम्ही धाडसी असू. हा खेळ दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे,” असे मत बुधवारच्या लढतीपूर्वी एफसी गोवा गॅफरने व्यक्त केले.
गेल्या महिन्यात, एफसी गोवाने आयएसएल 2022-23 साठी त्यांचा 27-सदस्यीय संघ जाहीर केला, त्यात 22 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या नऊ खेळाडूंचा समावेश आहे.
“आमच्याकडे संघात अनेक तरुण खेळाडू आहेत, हे खरे आहे. परंतु, फुटबॉलमध्ये समतोल आवश्यक आहे आणि आम्ही त्या पैलूवर काम केले आहे. आमच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत जे संघात भरपूर अनुभव जोडतात, त्यामुळे अजिबात अडचण येणार नाही, ” अशी टिप्पणी टॅक्टिशियनने केली.
‘येथे एका चांगल्या आव्हानासाठी आलो होतो, ते लवकरच सुरू होईल‘
एफसी गोवामध्ये नव्याने दाखल झालेला एकेर ग्वारोटक्सेना याने सामनापूर्व पत्रकार परिषदेत म्हटले की, “एफसी गोवा येथे चांगले आव्हान शोधत आलो आणि मला हे माहीत आहे की क्लब मला ट्रॉफी जिंकण्याची उत्तम संधी देत आहे. हे सर्व आमच्या पहिल्या सामन्यापासून सुरू होते, जे आम्ही बुधवारी ईस्ट बंगालविरुद्ध खेळू. पण सध्या, मी या सर्व गोष्टींचा विचार करत नाही – माझे लक्ष पूर्णपणे पहिल्या गेमवर आहे आणि आम्हाला ते जिंकायचे आहे,” तो पुढे म्हणाला.
ग्वारोटक्सेना याने खुलासा केला की हंगामापूर्वीच्या तयारीने त्याला आत्मविश्वास दिला आहे. “आम्ही प्रशिक्षणादरम्यान खेळाच्या एका विशिष्ट शैलीचे पालन केले आहे आणि आम्ही आमच्या सामन्यांदरम्यान देखील त्याची पुनरावृत्ती करू. त्याच वेळी, आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला मोकळे मन कसे राखायचे याचे प्रशिक्षण देखील दिले आहे जेणेकरून प्रत्येक खेळ आमच्याकडून काय मागणी करतो त्यानुसार कामगिरी करता येईल, असे तो म्हणाला.