गोवा खबर:रेव्होलूशनरी गोवन्स पक्षातर्फे शनिवारी सांत आंद्रेतील बातीम पंचायत सभागृहात, आपल्या कार्यकर्त्यासाठी पंचायत राज कायद्या विषयी माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे आयोजन आर. जी चे प्रमुख मनोज परब, सहसंस्थापक विश्वेश नाईक आणि सांत आंद्रे चे आमदार विरेश बोरकर यांच्या निदर्शनाखाली करण्यात आले.
अजय खोलकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेत, पंचायत राज कायद्याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य आर. जी. चे कार्यकर्ते उपस्थित होते. अजय खोलकर यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.
आर. जी. चे प्रमुख मनोज परब यांनी स्वतः कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निवारण केले. आज पासून गोव्यात पंचायत क्रांती २:० ची सुरुवात झाली असून, प्रत्येक गावागावात असणारे आर. जी. चे कार्यकर्ते हे आपला गाव वाचवण्यासाठी पंचायत सिस्टम मध्ये भाग घेतील, त्याचबरोबर पंचायतीमध्ये होणारे, व्यवहार, गैरकारभार यांच्यावरही लक्ष ठेवून असतील.
रेव्होलूशनरी गोवंन्स हा एकमेव असा पक्ष आहे जो सत्तेसाठी नसून, गोव्याच्या आणि गोवेकरांच्या अस्तित्वासाठी नेहमी लढत आहे,आणि हेच लक्षात घेवून आज आम्ही ग्रामपंचायतीकडे आमचे लक्ष केंद्रित केले आहे. आजपासून रेव्होलूशनरी गोवंन्सची पंचायत क्रांतीची सुरुवात होत असून, प्रत्येक गोवेकरानी या क्रांतीमध्ये सहभागी व्हावे, आणि आपला गाव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. आर. जी. ची पंचायत क्रांती भविष्यात गोव्यात नवीन बदल घडवून आणणारी असून जनतेचा विश्वास फक्त आर. जी. च असणार असे मनोज परब यावेळी म्हणाले
आर. जी. चे पहिल्यांदाच निवडून आलेले पंच सुद्धा ह्या कार्यशाळेमध्ये उपस्थित होते. त्यांनीही आपआपले अनुभव आणि आपण जनतेबरोबर सदैव असल्याचे यावेळी बोलून दाखवले.