गोवा खबर:केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्यावतीने क्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ठ व्यक्तिंना मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद असे अनेक पुरस्कांर देण्यात येतात.

केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळ मंत्रालयाची मान्यता असलेल्या आणि १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या काळांत झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृश्ट कामगिरी केलेल्या आणि संबंधित खेळ महासंघांनी पाठविलेल्या पात्र खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यक्तिंनी पुरस्कारासाठी आपले अर्ज २१ ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मंत्रालयाच्या dbtyas-sports.gov.in. या पोर्टलवर पाठवावे, असे गोवा सरकारच्या क्रिडा आणि युवा व्यवहार खात्याने कळविले आहे.