Connect with us

गोवा खबर

भारतमातेचा अवमान करणार्‍यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?: सुर्वे

Published

on

Spread the love

गोवा खबर: 75 वर्षांपूर्वी ज्यांच्या कार्यकाळात आपल्या देशाचे विभाजन झालेतो काँग्रेस पक्ष ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्‍या कन्हैयाकुमारला सोबत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहेपाद्री जॉर्ज पोनैय्या जो भारतमातेला ‘अपवित्र’ मानतो आणि फक्त येशूला मानतोतसेच हिंदूंच्या देवीदेवतांना न मानता त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करतोराहुल गांधी जॉर्ज पोनैय्यासारख्या पाद्र्यांना घेऊन यात्रा काढतातत्यावेळी त्यांच्या उद्देशावरच प्रश्न निर्माण होतोअशा भारतमातेचा अवमान करणार्‍यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहेअसा  प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली राज्य प्रवक्ते नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थित केलाते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारत तोडो’मध्ये सहभागी जॉर्ज पोनैय्यासारखे ईसाई पाद्री !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ संवादात बोलत होते.

      ‘भारत व्हाईस’च्या संस्थापिका गायत्री एन्म्हणाल्या कीपाद्री जॉर्ज पोनैय्या याने नुकतेच भारतमातेचा अवमान करणारे वक्तव्य केलेत्यांनी एक वर्षापूर्वीही भारतमातेला शिव्या देऊन वादग्रस्त वक्तव्ये केली होतीज्या धरतीला आपण मातेसमान मानतोत्याविषयी घृणास्पद वक्तव्य करण्यार्‍या या पाद्रीची मानसिकता यातून लक्षात येते. ‘जीझस’ला सर्वांनी मान्य करावेहे थोपवण्यासाठी ख्रिस्ती सतत प्रयत्नरत आहेतपूर्वी हे ‘इन्क्विझिशन’ करायचेआता वेगळ्या पद्धतीने जीझस आणि त्यांचा पंथ आपल्यावर लादत आहेतआज दक्षिण भारतात तर शाळांमध्ये सुद्धा हिंदू विद्यार्थ्यांवर उघडपणे ख्रिस्ती धर्माची सक्ती केली जात आहेहे सर्व थांबायला हवे.