गोवा खबर:संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय पेडणेच्या विद्यार्थ्यांसह अभाविप पेडणे शाखेने निकालानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन महाविद्यालय प्रशासनाला सादर केले.
कोरोनाच्या काळात परीक्षा ऑनलाइन झाल्यामुळे विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन प्रक्रिया थांबवली होती. मात्र आता परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन असल्याने उत्तरपत्रिकांची फेरतपासणी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे झाले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता या परिक्षेत आलेल्या निकालानंतर त्रास होत आहे. अभाविप कोकण प्रदेश सहमंत्री अवधूत कोटकर म्हणाले, “आम्ही गोवा विद्यापीठाचे दरवाजे ठोठावू आणि गोवा विद्यापीठाने गोव्यातील विद्यार्थ्यांना नाकारलेल्या पुनर्मूल्यांकनाचा हक्क विद्यार्थ्यांना परत मिळवून देऊ.”

यावेळी अभाविप उत्तर गोवा विद्यार्थिनी प्रमुख अवनी शिंदे, महाविद्यालयचे विद्यार्थी संयोग नाईक, तुषार वराडकर व इतर उपस्थित होते.