Connect with us

गोवा खबर

२५ ऑगस्टच्या आत निकाल जाहीर करा : अभाविप

Published

on

Spread the love

 

 गोवा खबर:गोवा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊन दोन महिने झाले आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठ अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठात पुढील प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. गोवा विद्यापीठाचे शैक्षणिक कॅलेंडर दोन महिने उशिरा आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवा विद्यापीठाला पुढील 25 ऑगस्ट पर्यंत निकाल जाहीर करण्याचे आवाहन केले. तसे न केल्यास त्याचे परिणामास विद्यापीठाला सामोरे जावे लागतील असा इशारा अभाविपने दिला आहे.

अभाविप गोवा प्रदेश संयोजक धनश्री मांद्रेकर म्हणाल्या , “परीक्षेसाठी योग्य पायाभूत सुविधा विकसित करण्यात गोवा विद्यापीठाचे अपयशी ठरले आहे. हे यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.”

अभविप कोकण प्रांत सहमंत्री अवधूत कोटकर म्हणाले , दिलेल्या वेळेत निकाल जाहीर न झाल्यास त्याचे परिणामास विद्यापीठाला सामोरे जावे लागेल .

या शिष्टमंडळात अभावीप केंद्रीय कार्य समिती सदस्य प्रभा नाईक पणजी महानगर मंत्री सर्वेश तळवळकर , संज्योत नारोजी , यश कंटक , अक्षय शेट, साहिल महाजन , राज शेट्येकोरगावकर , सिंधुराज घैसास , दीप्ती कांबळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.