Connect with us

क्रीडा खबर

क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे रोड रेसचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनी आझादी का अमृत महोत्सवानिमित्त राज्य पातळीवरील समारंभानंतर जुने सचिवालय पणजी ते मिरामार आणि परत अशा रोड रेसचे आयोजन केले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून ३ वयोगटांमध्ये – १४ ते १६ वर्षे, १७ ते १९ वर्षे आणि २० वर्षे आणि त्यावरील पुरुष आणि महिलांसाठी रोड रेसचे आयोजन केले आहे.

या रोड रेसमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या प्रवेशिका जन्मतारखेसह क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय, कांपाल, पणजी येथे १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत वैयक्तिकरित्या किंवा विशेष मेसेंजरद्वारे सादर करू शकतात.

सर्व सहभागींनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता जुन्या सचिवालयात योग्य स्पोर्ट्स किटमध्ये हजर रहावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकारी श्री राम डी. कामत यांच्याशी मोबाईल क्रमांक ७०३०४५००९१  वर संपर्क साधावा.