गोवा खबर:फॉरेस्ट स्पाईस जीनने प्रतिष्ठेच्या स्पिरीटत्झ निवड पुसस्कार 2022 मध्ये दोन रौप्य पदके पटकाविण्याची कामगिरी करून दाखविली. यातील एक पुरस्कार लिक्विड टेंस्टिंग व गुणवत्तेसाठी तर दुसरा पुरस्कार पॅकेजिंगसाठी आहे. अनुकरणीय गुणवत्ता तशेच पॅकेजिंगमधील उत्कृष्ठतेसाठी मिळालेले हे पुरस्कार स्पिरीटत्झ व ब्लाइंड चाचणीतली मद्य शीतपेयांच्या ब्रँड मधील प्रतिष्ठीन रेंटिंग मधील गणले जातात. भारतातली अशा प्रकारचा हा पहिला पुरस्कार आहे.
फॉरेस्ट स्पाईस जीनला जगातील प्रमुक अश्या काही ब्रँडच्या सर्धे नंतर हे पुरस्कार मिळाले आहेत. टोनिया समूह आनी गोवा राज्यासाठी ही मोठी गौरवास्पद कामगिरी आहे अशें टोनिया ग्रुपचे (मद्य विभाग) वेवस्थापकीय संचालक मारियो सिक्वेरा हांणी सांगितले. “हे केवळ आणखी एक जीन अथवा आणखी एक प्रकार नाही. फॉरेस्ट स्पाईसच्या माध्यमातून आम्ही अपवादात्मक अश्या जेनेव्हर प्रकारच्या गोल्डन स्टॉ जेनेव्हर मूळ डच जीनचा अनुभव परत आणण्याचा तशेच त्याचा इतिहास, विविधता व जागतिक परत सन्मान मिळवून देण्याच प्रयत्न केला आहे. मूळ हॉलंचडी जीन सुमार 100 वर्षाची जुनी आहे” असे त्यानी सांगितले.
फॉरेस्ट स्पाईसने टोनिया ग्रुपमध्ये नवीन युगाचा प्रवेश देखील केला आहे. कारण कंपनीने नैसर्गिक सौंदर्य आणि काळाच्या ओघात कमी झालेल्या साठ्यांचे जतन करण्याच्या प्रयत्नात हरित उपक्रम वाढवला आहे. उत्पादनाला सुरूवात केल्याच्या काही दिवसांतच अतिशय उत्साही प्रतिसाद मिळाला आहे आणि हा पुरस्कार आमचे कौतुक करणारा तशेच सर्वसमावेशक संस्कृती निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ देतो अशेंही त्यांनी म्हणले आहे.
विजेत्या ब्रॅण्डचे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्युरी पॅनलद्वारे पॅकेजिंगच्या (प्रत्येक श्रेणीसाठी स्वतंत्र पॅनेल) मूल्यमापन करून अंदाजे 450 सहभागी ब्रँड्सचा समावेश करून प्रत्येक नामांकित ब्रँडचे काटेकोरपणे परिभाषित निकषाद्वारे मूल्यांकन केले गेले. मद्य उत्पादन उद्योगातील उल्लेखनीय नावे आणि आघाडीच्या ब्रँडसह हा पुरस्कार सोहळा म्हणजे एक रोमांचक घटना होती. स्पिरिट्झ अवॉर्ड्स 2022 मद्य उद्योगातील काही शीर्ष ब्रँड्सच्या सामूहिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन करणार्या अनेक श्रेणींमध्ये विस्तारले आहेत.
टोनिया संबंधी
डॉ आन्तोनियो सिक्वेरा यानी स्थापन केलेल्या टोनिया समुहान 1970 मध्ये काजू व माडाच्या फेणीच्या उत्पादनान आपल्या कारकिर्दिला सुरूवात केली. 1985 पासून समुहाने व्हिस्की, बॅँडी, रम व दर्जेदार अशा ग्रेप व्हायन आनी स्पिरिट उत्पादनाला सुरुवात आपले नाव सर्वत्र केले आहे. सॅन आंद्रे लिकर्स, विला वार्सेली टॅक्विला, व्हायन आनी स्पिरिट ही त्यांची नामांकीत उत्पादने आहेत. ‘आमच्या उत्पादनाना ग्राहक आतां जास्त पंसती देत आहेत. गोव्यात येणारे पर्यटन आमची उत्पादना गोव्याची स्मृती म्हणून नेत असतात. टोनिया पीक कॉफी आजपावेतो तांच्या आठवणीत आहे. आमच्या प्रवासाबद्धल आम्हाला अभिमान आहे व टोनिया अभुभवाची देवाणःघेवाण करण्याचा आमचा संकल्प आहे ‘
संचालकः
श्री आलेक्सियो सिक्वेरा, श्री नॉर्मन सिक्वेरा, श्री मारियो सिक्वेरा
आमचे मास्टर ब्लँडर व व्हायन तज्ञ्न
आमचे लोकप्रिय ब्रँड- सिग्नेचर उत्पादनेः
सान आंद्रे लिकर्स, सान आंद्रे क्लब पोर्ट व्हायन, डॉम सांचोस क्लब पोर्ट व्हायन, विला वार्सेली सिल्वर टॅक्विला