श्रीमती नीता एम. अंबानी: “जागतिक खेळातील सर्वात लोकप्रिय शाखांपैकी एक अशी अॅथलेटिक्सची शाखा आहे आणि या एएफआय संघटनेचा उद्देश हा मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून येथील तरुण प्रतिभेला संधी आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन भारतीय ऍथलेटिक्सच्या वाढीला गती देणे हा आहे.”
गोवा खबर: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांनी भारतातील अॅथलेटिक्सच्या सर्वांगीण वृद्धीसक्षमतेकरिता दीर्घकालीन भागीदारीची घोषणा केली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हे गेल्या अनेक वर्षांपासून एएफआयसाठी समर्पित भागीदार म्हणून कार्यरत आहे आणि आता ही भागीदारी दोन्ही संस्थांमधील प्रतिबद्धता अधिक दृढ करण्यासाठी सज्ज आहे.
भागीदारीची ठळक वैशिष्ट्ये:
- या भागीदारीचे उद्दिष्ट हे देशभरातील भारतीय ऍथलीट्सची निवड करणे, त्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यांचा खेळ विकसित करणे आहे. तसेच या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा, प्रशिक्षण आणि क्रीडा-विज्ञान आणि वैद्यकीय साहाय्य प्रदान करणे हे ओडिशा रिलायन्स फाऊंडेशन ऍथलेटिक्स हाय-परफॉर्मन्स सेंटर आणि सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल यांच्यासह रिलायन्स फाऊंडेशनच्या एकात्मतेचा लाभ आहे.
- संस्थेच्या अशा मोठ्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, या भागीदारीमध्ये महिला क्रीडापटूंवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि लिंगभेद दूर करणे तसेच त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम करणे हे त्यांचे ध्येय असेल.
- एएफआयचे मुख्य भागीदार म्हणून रिलायन्स ही नाममुद्रा प्रमुख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरांमधील राष्ट्रीय संघाच्या जर्सीवर व प्रशिक्षण किटमध्ये दिसून येईल.
आयओसीच्या सदस्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक श्रीमती नीता एम. अंबानी याबाबत म्हणाल्या की, “भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनसह रिलायन्स फाऊंडेशनची भागीदारी अधिक वृद्धींगत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अॅथलेटिक्स ही जागतिक खेळातील सर्वात लोकप्रिय शाखांपैकी एक असून या संघटनेचा प्रमुख उद्देश हा मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून आमच्या तरुण प्रतिभेला संधी आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन भारतीय अॅथलेटिक्सच्या वृद्धीला गती देण्याचा आहे. मला खात्री आहे की, योग्य पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि भक्कम आधार यासह आम्ही आमचे आणखी काही तरुण खेळाडू लवकरच जगभरात विजयाच्या शिखरावर पोहोचलेले अनुभवणार आहोत! ही भागीदारी भारतातील ऑलिम्पिक चळवळीला भक्कम करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. आदिल सुमारिवाला म्हणाले की, “श्रीमती नीता अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे मुख्य भागीदार म्हणून त्यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. त्याच्यासोबत एएफआय ही संघटना गेल्या काही वर्षांपासून कार्य करत आहे. आम्ही आमच्या ऍथलेटिक्स चमूचा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग वाढताना अनुभवले आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वचनबद्ध भागीदारीसह, , लवकरच अनेक विषयांमध्ये सहभाग आणि आंतरराष्ट्रीय यशामध्ये निश्चितच वाढ होईल, अशी आम्हाला खात्री आहे. ही भागीदारी सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करेल. एक मजबूत कुशल सेतू तयार होईल आणि आगामी काळात भारताला अभिमान वाटेल असे संभाव्य पदक विजेतेही होतील.”
रिलायन्स फाउंडेशनचा ऍथलेटिक्सचा प्रवास:
- रिलायन्स फाऊंडेशनने वर्ष २०१७ पासून रिलायन्स फाऊंडेशन युवा क्रीडा उपक्रमाद्वारे अॅथलेटिक्स विकासार्थ योगदान दिले आहे. त्यामुळे देशभरातील ५० हून अधिक जिल्ह्यांतील ५,५०० हून अधिक शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचता आले आहे.
- रिलायन्स फाऊंडेशनने २०१८ मध्ये ओडिशा सरकारच्या भागीदारीबरोबर ओडिशा रिलायन्स फाऊंडेशन अॅथलेटिक्स एचपीसी हे एक उच्च-कार्यक्षमता केंद्र स्थापन केले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते आणि राष्ट्रीय विक्रमधारक येथून उदयास आले आहेत. अलीकडेच एचपीसीमधील ज्योती यारराजी (सध्या कॅमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करत आहेत) आणि अमलान बोरगोहाई यांनी दीर्घकालचे राष्ट्रीय विक्रम मोडले आहेत.
- रिलायन्स फाऊंडेशन हे २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय तुकडीसोबत रिलायन्स फाऊंडेशनच्या फिजिओथेरपिस्टसह क्रीडा विज्ञान आणि औषधांच्या सहाय्याने एएफआयलादेखील साहाय्य करत आहे.
रिलायन्स फाऊंडेशन भारताच्या पुढील उत्कृठ खेळाडू तयार करण्यासह त्यांना प्रोत्साहन आणि सक्षम करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमधील सुधार, कौशल्य विकास, तंत्रस्नेही सशक्तीकरण आणि क्रीडापटू तयार करून भारतीय खेळांची परिसंस्था सक्षम करण्यासाठी एएफआयसह अनेक भागीदारांसह कार्य करत आहे. श्रीमती नीता एम. अंबानी या भारताच्या ऑलिम्पिक चळवळीचे नेतृत्व करत आहेत आणि भारतातील पुढील पिढीसाठी क्रीडा संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. वर्ष २०१६ पासून आयओसी सदस्या म्हणून त्यांच्या भूमिकेमुळे क्रीडा परिवर्तनासाठी आणि ऑलिम्पिक चळवळीशी संलग्न होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मौल्यवान आंतरराष्ट्रीय मंच उपलब्ध होण्यासाठी सक्षम केले आहे. १४० वे आयओसी सत्र २०२३ चे मुंबई (भारत) येथे यजमानपदासाठी बोली जिंकलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले आहे.