Connect with us

क्रीडा खबर

एफसी गोवाकडून स्ट्रायकर अल्वारो वॅझकेझ दोन वर्षांसाठी करारबद्ध

Published

on

Spread the love

 

 

~ केरला क्लबला 2021-22मध्ये आयएसएलच्या फायनलमध्ये पोहोचवण्यात मोलाचा वाटा; लीगमध्ये 8 गोल ~

 

गोवा खबर: एफसी गोवा क्लबने स्पेनचा प्रतिभावंत फुटबॉलपटू अल्वारो वॅझकेझ यालादोन वर्षांसाठी करारबद्ध आहे. त्यामुळे 2024 समरमध्ये तो आयकॉनिक ऑरेंज जर्सीमध्ये खेळताना दिसेल. स्ट्रायकर अल्वारोने लीगमध्ये 8 गोल करताना केरला ब्लास्टर्सला 2021-22मध्ये आयएसएलच्या फायनलमध्ये पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने दोन गोल करण्यातही (असिस्ट) मदत केली होती.एफसी गोवाशी करारबद्ध होताना खूप आनंद होत असल्याचे वॅझकेझ याने एफसीगोवाडॉटइनशी बोलताना सांगितले.

 

आयएसएलच्या पहिल्या-वहिल्या हंगामात 2021-22 मध्येवॅझकेझने छाप पाडली. त्याने केरला ब्लास्टर्सचे प्रतिनिधित्व करताना सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाचे योगदान दिले. स्पर्धेत 8 गोल करताना दोन असिस्ट केले. त्याच्यासह अन्य खेळाडूंच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर केरला ब्लास्टर्सनी फायनलमध्ये धडक मारली.

 

“एफसी गोवाशी करारबद्ध होत असल्याने खुश आहे. या क्लबची खेळण्याची अनोखी स्टाईल मला कायम प्रभावी करत आहे. शिवाय क्लबचे महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये दूरदृष्टी आहे. एफसी गोवाचे पदाधिकारी आणि मुख्य प्रशिक्षक इडू बेडिया यांच्याशी चर्चा केल्यावर, या क्लबमध्ये खेळताना मी स्वतःला आणखी सिद्ध करू शकतो, असा विश्वास वाटल्यामुळे कराराला होकार दिला,” असेवॅझकेझ म्हणाला.

“एफसी गोवा क्लबचे महत्व अधोरेखित करताना, एफसी गोवा हा इंडियन सुपर लीगमधील एक सर्वात मोठा आणि लोकप्रिय क्लब आहे, असे मी मानतो. मागील आयएसएल हंगामात क्लबची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नसली तरी पुढील हंगामात तो पुन्हा टॉप क्लबमध्ये स्थान मिळवले, असा मला विश्वास वाटतो. एफसी गोवाचे खूप चाहते आहेत. त्यामुळे हजारो फॅन्सच्या उपस्थितीत मला फातोर्डावर खेळण्याचा अनुभव घ्यायचा असतो. त्यामुळे गौर्सकडून पहिला सामना खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्या लढतीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे, असे अल्वारो वॅझकेझने म्हटले.”

 

एफसी गोवाचे डायरेक्टर ऑफ फुटबॉल रवी पुस्कूर यांनी अल्वारो वॅझकेझच्या समावेशाबद्दल आनंद व्यक्‍त केला. “अल्वारो एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याचा खेळ हीच त्याची ओळख आहे. अल्वारोने भारतातील फुटबॉल आणि येथील कल्चर आपलेसे केले आहे. एफसी गोवाकडून खेळताना तो पूर्ण क्षमतेने  खेळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.”

फॉर्ममधील सातत्य आणि सर्वोत्तम फिटनेस जमेची बाजू

 

बार्सिलोनामध्ये जन्मलेल्या वॅझकेझचे सर्वाधिक करियर स्पेनच्या फुटबॉलमधील आहे. 31 वर्षीय अल्वारोने ला-लिगा क्‍लबमधील आरसीडी इस्पॅनॉल युवा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पुढे स्पेनमधील टॉप क्‍लबकडून खेळताना रेआल माद्रिद आणि बार्सिलोनाविरुद‍्ध गोल केले होते. दोन वर्षांनंतर स्ट्रायकर वॅझकेझने त्याचा मुक्‍काम गेटॅफेकडे हलवला. या क्‍लबचे त्याने चार हंगाम प्रतिनिधित्व केले. स्पेनचा हा फुटबॉलपटू इंग्लिश प्रीमियर लीगमध्येही खेळला. तिथे त्याने स्वॉन्सिया सिटीचे प्रतिनिधित्व केला. मात्र, हा करार फार मोठ्या कालावधीचा नव्हता.

 

स्पेनमध्ये ज्युनियर स्तरावर खेळताना 2011मध्ये झालेल्या फिफा 20 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करण्यात वॅझकेझला यश आले. यूएफा 21 वर्षांखालील युरो स्पर्धेच्या (2013) स्पेनच्या विजेत्या संघातही त्याचा समावेश होता.

 

17 वर्षांच्या क्‍लब आणि स्पेन देेशासाठीच्या फुटबॉल कारकिर्दीत अल्वारोने 344 सामने खेळताना 80 गोल केलेत. तसेच 19 गोल करण्यास मदत (असिस्ट) केली आहे.