गोवा खबर:दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेरेंडीपिटी आर्ट्स फेस्टीव्हल आपल्या ५व्या आवृत्तीसह , एका नवीन दृष्टिकोनात आणि गोव्याला या प्रदेशातील एक प्रमुख सांस्कृतिक स्थळ बनवण्याच्या मोठ्या आशेने पुन्हा एकदा येत आहे. ह्या उत्सवाची कल्पना तशीच राहिली असली तरी, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
हा महोत्सव समुदायाच्या संकल्पनेचा विस्तार करेल आणि उत्सवाच्या अभ्यागतांसाठी आकर्षक आणि कार्यक्रमांची मालिका तयार करण्याचा प्रयत्न करेल. सेरेंडीपिटी आर्ट्स फेस्टिवल संपूर्ण दक्षिण आशिया आणि जगभरातील कलाकार, क्युरेटर , संभाषण आणि सर्जनशील सहकाऱ्यांना एकत्र आणून जीवनाचा उत्सव साजरा करेल.

महामारीत २ वर्षे ऑनलाइन फेस्टीव्हल बघून कंटाळलेल्या लोकांमध्ये हा ऑफलाईन कार्यक्रम नवी उत्सुकता जागवणार आहे. नवीन प्रेक्षकांना कलाकार आणि कलाकृतींची ओळख करून देणार, प्रोग्रामिंग कल्पना आणि शक्यतांचा संपूर्ण श्रेणीसाठी मार्ग खुला करणार जो डिसेंबर २०२२ मध्ये सुरू होणार.
तर ह्या विषयावर बोलताना, सेरेंडीपिटी आर्ट्स फेस्टिवल फाउंडेशन अँड फेस्टिवलच्या संचालिका स्मृती राजगारहीया म्हणाल्या “ त्यांना प्रत्येकाला हे सांगण्यास आनंद होत की हा कार्यक्रम गोव्यात पुन्हा येणार आणि पणजीमध्ये फेस्टिव्हलची ५ वी आवृत्ती साजरा करणार
सेरेंडीपिटी आर्ट्स फेस्टीव्हल हे खरोखरच काय आहे?
सेरेंडीपिटी फेस्टिवल सर्जनशीलतासाठी मंजुळ उपक्रम आहे आणि सांस्कृतिक विकार फाउंडेशन आहे जे सांस्कृतिक विकासाला चालना देते आणि दक्षिण आशियातील उध्यंमुख कलाकारांना समर्थन देत व दक्षिण आशियातील सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय परिस्थितीला संबोधित करत नवीन सर्जनशील धोरण कलात्मक हस्तपेक्ष आणि सांस्कृतिक भागिदरांना प्रोत्साहन देणे हे फाऊंडेशनचे उद्दीष्ट आहे. फाऊंडेशनचे कार्यक्रम अनेक क्षेत्रातील भगिदरांसोबत नावीन्यपूर्ण सहकर्याद्वरे सामाजिक चालना देण्यासाठी आणि संपूर्ण कलांमध्ये आंतरविद्याशाखीयतेचा शोध घेऊन डिझाइन केलेले आणि सुरू केले आहेत.