Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह  घटना दुरुस्तीची आवश्यकता !

Published

on

Spread the love
गोव्यात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी !
 

गोवा खबर:आज देशामध्ये दर वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहेअनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असलातरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहेधर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा प्रचार करणे (Propagate Religion) हा शब्द काढला पाहिजेत्यासोबत गोवा सरकारने विधानसभेत या संबंधीचा ठराव पारित करून केंद्र शासनाला पाठवला पाहिजेतरच अवैध धर्मांतरणावरती संपूर्ण बंदी येईलस्वत:च्या धर्माचे पालन करण्याला कोणतीही आडकाठी आणण्याची आवश्यकता नाहीमात्र इतरांना फसवूनजबरदस्ती करून किंवा त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन केल्या जाणार्‍या धर्मांतरावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहेअशी मागणी सीबीआयचे माजी हंगामी संचालक  एम्नागेश्वर राव यांनी पत्रकार परिषदेत केली.

       ते दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिनी फोंडागोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’तील विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होतेया वेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेख्रिस्ती पंथ सोडून हिंदु झालेल्या तेलंगणा येथील श्रीमती एस्थर धनराजछत्तीसगड येथे लाखो हिंदूंची घरवापसी करणारे भाजपचे प्रदेशमंत्री श्रीप्रबल प्रतापसिंह जुदेव आणि नेपाळ येथील विश्व हिंदु महासंघचे जिल्हाध्यक्ष श्रीशंकर खरेल उपस्थित होते.

       या वेळी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले कीधर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृती करून त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजेधर्मशिक्षण घेऊन धर्माचरण प्रारंभ केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाहीगोव्याचे मुख्यमंत्री श्रीप्रमोद सावंत यांनी धर्मांतर बंदी कायदा करण्याची घोषणा केली आहेत्याचे आम्ही स्वागत करतोतसेच गोव्यात डॉमनीक आणि अन्य ख्रिस्ती प्रचारकांकडून जे धर्मांतर चालू आहेते रोखण्यासाठी गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासह संविधानात पालट करायला हवा

छत्तीसगड येथील भाजपचे प्रदेशमंत्री श्रीप्रबल प्रतापसिंह जुदेव म्हणाले कीहिंदूंच्या धर्मांतर करणार्‍या विदेश शक्तींकडे प्रचंड पैसा आणि साधने आहेतमाझ्या वडीलांनी लाखो हिंदूंचीतर मी 15 हजार हिंदूंची घरवापसी केली आहेमात्र हे करतांना आमच्यावर जीवघेणी आक्रमणे मिशनरीनक्षलवादी यांच्याकडून झालेली आहेतधर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धर्म समिती स्थापन करून धर्मसेना उभी केली पाहिजेत्याने चांगला लाभ झालेला आहे.

 नेपाळ येथील श्रीशंकर खरेल म्हणाले कीनेपाळमध्ये कोटी लोकसंख्येच्या देशात 30 लाख लोक धर्मांतरीत झाले आहेतही चिंतेची बाब आहेहे धर्मांतर रोखण्यासाठी गरीबीशिक्षण आणि अन्य मूलभूत गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे

तेलंगणा येथील एस्थर धनराज म्हणाल्या कीमी स्वतख्रिश्चन होतेमात्र अमेरिकेत गेल्यावर बायबलचा अभ्यास केल्यावर त्यात तर्कशास्त्र नसल्याचे लक्षात आलेपुढे भारतात आल्यावर मिशनरी लोकांकडून धर्मांतरासाठी चाललेली षड्यंत्रे पाहून त्याविरोधात जागृती चालू आहेतसेच धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मांत आणण्याचे आणि युवकांना समुपदेशन करण्याचे काम करत आहे.