Connect with us

गोवा खबर

एफसी गोवाच्या कोचिंग स्टाफमध्ये गोर्का अझकोरा आणि जोएल डोन्स यांची निवड 

Published

on

Spread the love

 

~ क्लबचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्लोस पेना यांची नियुक्ती झाल्यानंतर कोचिंग स्टाफमध्ये सामील होणारी ही पहिलीच स्पॅनिश नावे आहेत ~

 

गोवा खबर :  देशातील एक प्रमुख फुटबॉल क्लब असलेल्या एफसी गोवाने आगामी हंगामासाठी गोर्का अझकोरा आणि जोएल डोन्स यांची अनुक्रमे क्लबचे नवीन सहाय्यक प्रशिक्षक तसेच स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

 

अझकोरा हे यूइएफए ए (UEFA A) परवानाधारक असून, २०१८ मध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर गेल्या तीन हंगामात ऍथलेटिक बिल्बाओ येथे युवा संघांसोबत काम करत आहे. गोर्का यांनी पाच ला-लिगा आणि ११६ सामन्यांचा अनुभव आहे.  याशिवाय यूएफा कप (पूर्वीच्या युरोपा लीग) मध्ये तीन सामने खेळले आहेत.

गोर्का अझकोरायोग्य क्षणी योग्य क्लबशी करारबद्ध होत आहे

 

“एफसी गोवामध्ये सामील होऊन खूप आनंदी आहे. क्लबचा सपोर्ट स्टाफ म्हणून आमच्याकडे असलेल्या खेळाडूंबद्दल आणि सांघिक भावनेबद्दल खूप आत्मविश्वास वाटतो, ” असे मत अझकोरा यांनी व्यक्त केले.

 

ते पुढे म्हणाले, “मला विश्वास आहे की मी योग्य स्टाफसह (वरिष्ठ सहकारी आणि कर्मचारी, क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू) आणि योग्य क्षणी एका प्रथितयश क्लबमध्ये जात आहे. त्यामुळे कधी एकदा गोवा गाठतोय, असे मला वाटतेय. हंगामपूर्व कालावधीत एखाद्या क्लबसोबतचा करार खूप महत्त्वाचा असतो. आगामी हंगाम हा गोवा क्लबसाठी एक चांगला हंगाम असणार आहे, मला खात्री आहे.”

डोन्सनवीन हंगामासाठी उत्सुक

 

डोन्स हे स्पोर्ट्स सायन्समधील पदवी आणि एफसी बार्सिलोनाकडून टीम स्पोर्ट्समधील उच्च कामगिरीमध्ये व्यावसायिक पदव्युत्तर पदवी असलेले अनुभवी स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक आहेत. डोन्सकडे यूइएफए ए (UEFA A) परवाना देखील आहे. हाँगकाँग प्रीमियर लीगमध्ये 2 वर्षांच्या कार्यकाळाव्यतिरिक्त त्यांनी स्पेनमधील क्लबसह स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच म्हणून अनेक वर्षे काम केले आहे.

 

“एफसी गोवा आणि मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी मला दिलेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. एफसी गोवा क्लबला इंडियन सुपर लीगच्या शीर्षस्थानी नेण्यासाठी आवश्यक काम करण्यादृष्टीने मी उत्सुक आहे,” असे डोन्स म्हणाले. “मी भारताबद्दल – संस्कृती, खाद्यपदार्थ, परंपरा आणि विशेषतः लोकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. मला खात्री आहे की हा येणारा सीझन माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी या अद्भुत देशात एक अद्भुत अनुभव असेल,” असे त्यांनी पुढे म्हटले.

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांनी संघाच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये डोन्सच्या समावेश असावा यासाठी प्रयत्न केला. “जोएल, वरिष्ठ संघांसोबत काम केल्याचा आणि फुटबॉलपटूंसोबत काम करण्याचा भरपूर अनुभव असलेला एक हुशार व्यक्ती आहे. मी त्याच्यासोबत पूर्वी लेलेडासोबत काम केले आहे. मला विश्वास आहे की आमच्या खेळाडूंना योग्य मार्ग देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या उच्च शारीरिक स्तरावर नेण्यासाठी तो योग्य माणूस आहे,” असे पेना म्हणाले.