Connect with us

गोवा खबर

म्हापशात कार अपघातात बेळगावचे तिघे ठार

Published

on

Spread the love
गोवा खबर:उत्तर गोव्यातील कुचेली – म्हापसा येथे रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघात बेळगावचे तिघे जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
 कर्नाटक नोंदणीकृत असलेल्या स्विफ्ट कारची पहाटे ४ च्या सुमारास कुचेली येथे झाडाला जोरदार धडक बसून अपघात झाला.यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून जखमीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
 म्हापशातील कार अपघातातील सर्व युवक बेळगावचे असल्याची माहिती मिळाली असून  नयर अनगोलकर (२८), रोहन गदद (२६) व सनी अणवेकर (३१) अशी त्यांची नावे आहेत. विशाल कारेकर (२७) हा युवक जखमी असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.