गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आल्तिन येथे महासंघाची बैठक घेतली आणि गोव्यात प्रादेशिक भारतीय पाककला संस्था स्थापन करण्याच्या महासंघाच्या प्रस्तावावर चर्चा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात प्रादेशिक भारतीय पाककला संस्था सुरू करण्यासाठी आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. कोणतीही पर्यटन इमारत किंवा कोणतीही बंद शाळा इमारतींचा शोध घेऊन त्यांचे महासंघ नूतनीकरण करू शकतो आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर संस्था सुरू करू शकते असे ते म्हणाले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे वरिष्ठ संचालक श्री. सौगत रॉय चौधरी यांनी प्रस्तावित संस्थेबद्दल माहिती देताना सांगितले की महासंघाद्वारे स्वित्झर्लंडच्या इकोल हॉटेलियर दी लॉसेन (EHL एज्युकेशन ग्रुप) च्या भागीदारीत गोव्यात प्रादेशिक पाककला संस्था नियोजित आहे . ताज लक्झरी हॉटेल प्रॉपर्टीजसह सुरू होत असलेल्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण व्यतिरिक्त असेल. स्विस व्यावसायिक डिप्लोमा कार्यक्रम ताज लक्झरी हॉटेल प्रॉपर्टीजने सुरू केली आहे.

भारतातील विविध प्रादेशिक पाककृतींचा समृद्ध वारसा आणि क्षमता अलीकडच्या काळात दिसून येत आहे. हे “प्रादेशिक भारतीय खाद्यपदार्थांसाठी दीपगृह” तयार करण्याची गरज आहे जे सर्व पाककृतींचे विशेषत: गोवा महाराष्ट्रीयन, बंगाली, नॉर्थ-ईज, राजस्थानी, हैदराब्दी इत्यादींचे प्रशिक्षण देईल. यामुळे स्थानिकांना आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त करता येईल असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी संस्था स्थानिक युवकांना इकोल हॉटेलियर दी लॉसेन जगभरातील व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यास सक्षम करेल. एकदा प्रशिक्षित झालेले तरुण हॉटेल्स, एअरलाइन्स, क्रूझ-लाइन्स, केटरिंग आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीसह हॉस्पिटॅलिटी उद्योगातील जागतिक दर्जाच्या मानकांशी जुळू शकतात असे सांगितले.
या बैठकीला समाजकल्याण मंत्री श्री.सुभाष फळदेसाई, सहयोगी संचालक श्री. प्रवीण रॉय, आयएचसीएलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री व्हिन्सेंट रामोस , सीआयआयचे अध्यक्ष श्री. अतुल व्ही जाधव, आणि भारतीय उद्योग परिसंघाचे श्री सौगत रॉय चौधरी उपस्थित होते.