Connect with us

गोवा खबर

आयुष कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

Published

on

Spread the love
गोवा खबर:मडगाव येथील ऊर्जा ट्रेनिंग एंड रिसर्ज अकादमी आणि साखळी येथील साई नर्सिंग इंस्टिट्यूट मार्फत साखळी येथे चालवल्या जात असलेल्या आयुष कौशल्य विकास प्रशिक्षण अर्थात योगा वेलनेस ट्रेनर आणि पंचकर्मा तंत्रज्ञ या अभ्यासक्रमाचे उद्धाटन आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते  करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. मिलिंद देसाई यांच्यासह ऊर्जा ट्रेनिंग एंड रिसर्ज अकादमीच्या डॉ. स्नेहा भागवत आणि तेजश्री पै उपस्थित होत्या.
गोवा सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयातर्फे हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
उद्धाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले,गोव्यात पंचकर्मा सहाय्यक आणि योगा प्रशिक्षकांची भविष्यात गरज भासणार आहे.हा अभ्यासक्रम त्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत हा अभ्यासक्रम मान्यता प्राप्त असून त्याशिवाय आयुष मंत्रालय आणि मानव संसाधन विकास फाउंडेशन गोवा यांची त्याला मान्यता आहे.
ऊर्जा वेलनेस ट्रेनिंग एंड रिसर्ज अकादमीतर्फे हा अभ्यासक्रम चालवला जाणार असून त्यांनी घेतलेल्या पुढाकारा बद्दल त्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सुयश चिंतितो,असेही मुख्यमंत्री म्हणाले.