गोवा खबर:आर्थिक विकास महामंडळ लिमिटेडने गोवा सरकारला २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी रु. ८६ लाख रूपयांचा लाभांश दिला.
ईडीसीने एकूण रु. ८३ कोटी उत्पन्न आणि रु. २७ कोटी विशेष उत्पन्न मिळून एकूण रु. १०० कोटी रूपये उत्पन्न मिळविले आहे. महामारी असूनही हे मागील वर्षाच्या समान पातळीवर ईडीसीने रु. 67 कोटीचा नफा मिळविला आहे.
ईडीसीनेही २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोविडविरुद्ध लढा देण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीला १ कोटी रूपये योगदान दिले आहेत . ईडीसीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून रु. १.३ कोटी खर्च केला आहे.