गोवा खबर:गोवा कायदा सेवा प्राधिकरणाने १ मे २०२२ रोजी राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे सकाळी ९.३० वाजता NALSA योजनेवर (असंघटित क्षेत्रातील कामगारांना कायदेशीर सेवा) मेगा कायदा सेवा शिबिराचे आणि कामगार दिनाचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्यासह उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, मंत्री आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.