Connect with us

गोवा खबर

राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेसाठी प्रवेशिका

Published

on

Spread the love

     

गोवा खबर:माहिती आणि प्रसिध्दी खात्याने गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन योजना- २०१४ अंतर्गत प्रवेशिका आमंत्रित केल्या आहेत.

छायाचित्र स्पर्धेचे विषय- पहिल्या गटासाठी गोव्याचा वास्तुविषयक वारसा: किल्ले, पारंपरिक/वारसास्थळ असलेली घरे, ऐतिहासिक मंदिरे, चर्च आणि मशिदी  तर दुसऱ्या श्रेणीसाठी 'गोव्यातील रस्ते' हा विषय असून
अशा दोन श्रेणीमध्ये घेण्यात येईल. 

प्रत्येक प्रवेशिकेमध्ये छायाचित्राच्या मागील बाजूस छायाचित्रकाराचे नाव, राष्ट्रीयत्व, पोस्टल पत्ता, मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता ब्लॉक अक्षरांमध्ये असावा. प्रवेशिकेसोबत वापरलेल्या कॅमेऱ्याचा तांत्रिक तपशील पाठवावा. प्रवेशासाठी मोबाइल आणि ड्रोन प्रतिमांचा विचार केला जाणार नाही. छायाचित्रकाराची छायाचित्रे आणि बायोडेटा १०० शब्दांमध्ये आणि प्रत्येकी निवासी प्रमाणपत्र प्रवेशिकेसोबत जोडावे. सर्व छायाचित्रे मूळ स्वरूपाची आहेत आणि प्रवेशकर्त्याने स्वतः काढलेले प्रमाणपत्र प्रवेशकर्त्याने जोडले पाहिजे. प्रवेशकर्त्यांनी उच्च रिझोल्यूशनच्या छायाचित्रासह सॉफ्ट कॉपी पाठवणे आवश्यक आहे.

 प्रवेशकर्त्यांनी १२ x ८ मध्ये रंगीत प्रिंट सादर करणे आवश्यक आहे आणि एक किंवा दोन्ही श्रेणींमध्ये जास्तीत जास्त ४ भिन्न छायाचित्रे पाठवू शकतात. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, वयाची अट नाही आणि कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही. ड्रोनने काढलेले छायाचित्र स्वीकारले जाणार नाही

गोव्यात जन्मलेले आणि गेल्या १५ वर्षात गोव्यात वास्तव्य असलेल्यांना प्र३धान्य दिले जाईल. प्रवेशिकेसोबत निवास दाखला जोडावा. प्रत्येक श्रेणीतील प्रथम पारितोषिक रोख रू. २०,०००, द्वितीय पारितोषिक – रु. १६,०००/- आणि तृतीय पारितोषिक रु. १२,०००  ट्रॉफी आणि प्रमाणपत्रासह. याशिवाय रु. २,००० ची पाच उत्तेजनार्त बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येईल.

छायाचित्रे माहिती खात्याची मालमत्ता बनतील आणि गोवा सरकारच्या व माहिती खात्याच्या प्रदर्शनासाठी आणि इतर प्रकाशनांसाठी वापरली जातील.

प्रवेशिका सादर करण्याचा शेवटचा दिवस ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. छायाचित्र प्रदर्शन राष्ट्रीय पत्रकार दिनी आयोजित केले जाईल आणि विजेत्यांना १६ नोव्हेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात बक्षिसे प्रदान केली जातील.

प्रवेशिकेवर “गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनासाठीच्या प्रवेशिका” असे स्पष्ट लिहावे. आणि  माहिती आणि प्रसिद्दी संचालक, ३ रा मजला, उद्योग भवन, पणजी , गोवा यांच्या नावे पाठवावे उशीरा पोचलेल्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही.