Connect with us

गोवा खबर

57 व्या ‘इफ्फीत  ‘इंडियन पॅनोरमा’ विभागाअंतर्गत 25 कथात्मक आणि 20 कथाबाह्य चित्रपट दाखवले जाणार

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI – International Film Festival of India) एक प्रमुख विभाग असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात 2026 च्या आयोजनाअंतर्गत 25 कथात्मक (फीचर) चित्रपट आणि 20 कथाबाह्य (नॉन फीचर) चित्रपट दाखवले जाणार आहेत. या 25 कथात्मक चित्रपटांमध्ये मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागातील पाच चित्रपटांचा समावेश आहे. ‘इंडियन पॅनोरमा 2026’ चा उद्घाटनीय कथात्मक चित्रपट म्हणून आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (हिंदी) या चित्रपटाची निवड झाली आहे. तर लीना यादव दिग्दर्शित ‘बिकमिंग’ (लडाखी) या चित्रपटाची उद्घाटनीय कथाबाह्य चित्रपट म्हणून निवड करण्यात आली आहे.

यंदा या विभागासाठी 404 समकालीन भारतीय कथात्मक चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून या कथात्मक चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तर कथाबाह्य चित्रपटांसाठी आलेल्या 358 प्रवेशिकांमधून 20 चित्रपटांची निवड केली गेली. या निवड झालेल्या चित्रपटांच्या माध्यमातून यंदाच्या महोत्सवात कथात्मक आणि कथाबाह्य प्रकारांतील तसेच अनेक भाषांमधील समकालीन भारतीय चित्रपटनिर्मितीचे व्यापक विश्व खुले होणार आहे. चित्रपट कलेच्या प्रसारासाठी सिनेमॅटिक, संकल्पना आणि सौंदर्यदृष्टीच्या पातळीवर असलेल्या कथात्मक आणि कथाबाह्य चित्रपटांची निवड करणे, हे इंडियन पॅनोरमाचे उद्दिष्ट आहे. कथात्मक आणि कथाबाह्य चित्रपटांसाठी नेमलेल्या स्वतंत्र परीक्षक मंडळांमार्फत त्यांच्या संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वात ही निवड केली जाते.

भारतीय चित्रपटसृष्टीतील नवे दृष्टिकोन, अभिव्यक्तीमधील अभिनवता आणि नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे, हा भारतीय कथात्मक चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक पुरस्कारामागचा उद्देश आहे.

इंडियन पॅनोरमा 2026 साठी निवडलेले 25 कथात्मक चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यांच्या कथात्मक चित्रपट परीक्षक मंडळाने ही निवड केली आहे. निवडलेल्या कथात्मक चित्रपटांमध्ये इंडियन पॅनोरमा कथात्मक चित्रपट विभागातील 20 चित्रपटांचा आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागाअंतर्गतच्या पाच चित्रपटांचा समावेश आहे.

क्र.चित्रपटाचे नावभाषादिग्दर्शक
1पारो – द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरीहिंदीगजेंद्र अहिरे
2लालो – कृष्ण सदा सहायतेगुजरातीअंकित भूपतभाई सखिया
3द केरला स्टोरी 2 गोज बियॉन्डहिंदीकामाख्या नारायण सिंह
4कृष्णावतारमहिंदीहार्दिक गज्जर
5बर्ड्स ऑन आइसलडाखीसाहिल शाह
6स्क्रोलतमिळकन्नन एस
7पागला घोडाबंगालीशेखर दास
8आदि अनंतमराठीमहेश लिमये (ऊर्फ शिवकुमार लिमये)
9उरुमन्यिशीदुयू ताब्यो
10बनारसहिंदीभारतबाला गणपती
11कबीर सर का आखरी लेसनहिंदीसरफराज
12सिंग गीथमतेलुगूसिंगीथम श्रीनिवास राव
13ओह माय डॉगहिंदीअमित राय
14रुबी-क्यूबकन्नडपी. शेषाद्री
15सेव मिक्चरहिंदीमुस्कान अस्थाना
16पिली चन्नेतुळूअनुपमा शरधी
17द ग्रेट ग्रँड सुपरहिरो एलियन्स का आगमनहिंदीमनीष सैनी
18थाई किझावीतमिळशिवकुमार मुरुगेसन
19सूर्ज्यमुखीआसामीअंतरा जी. जी. चौधरी
20सर्वम मायामल्याळमअखिल सत्यन

मुख्य प्रवाहातील चित्रपट विभाग

क्र.चित्रपटाचे शीर्षकभाषादिग्दर्शक
21कांतारा:  अ लेजेंड चॅप्टर 1कन्नडरिषभ शेट्टी
22बाप्यामराठीसमीर तिवारी
23मना शंकरा वर प्रसाद गारू (पंडागा की वस्तुन्नारु)तेलगूअनिल रवीपुडि 
24धुरंधरहिंदीआदित्य धर
25देऊळबंद 2मराठीप्रविण विठ्ठल तरडे

भारतीय  कथात्मक  चित्रपटांसाठी  सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी नामांकनं

कथात्मक चित्रपटांच्या  ज्युरीने ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ पुरस्कारासाठी खालील पाच चित्रपटांची निवड केली आहे:

क्र. चित्रपटाचे मूळ शीर्षकभाषादिग्दर्शक
1चेन्नई लव्ह स्टोरीतेलगूरवि वर्मा नांबुरी
2प्रत्यवर्तन बंगालीसमर्पण सेनगुप्ता
3तिघीमराठी     जिजीविषा काळे  
4स्लेज    काश्मिरीराजा शब्बीर मोहम्मद खान
5हनुमान अंशहिंदीडॉ.विशाल चर्तुर्वेदी

‘इंडियन पॅनोरमा 2026  साठी निवडलेले 20 कथाबाह्य चित्रपट

सहा सदस्यांच्या कथाबाह्य चित्रपटांच्या ज्युरीचे नेतृत्व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ हिमांशू शेखर खटुआ यांनी केले. एकूण 358 समकालीन भारतीय कथाबाह्य चित्रपटांच्या प्रवेशिकांमधून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांची समकालीन भारतीय मूल्यांचे दस्तऐवजीकरण करण्याची, त्याबाबत शोध घेण्याची, मनोरंजन करण्याची आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची क्षमता दर्शवतात.

क्र.चित्रपटाचे शीर्षक भाषा दिग्दर्शक 
1द अनसीन होली रिव्हर – सरस्वती हिंदीभास्कर विश्वनाथन
2बिकमिंगलडाखीलिना यादव
3शत-शत अटलहिंदीअतुल पांडे
4द हग ऑफ एम्प्टीनेसकन्नडप्रदिप कुमार शेट्टी के
5रेड कार्पेटअसामीआयमी बरुहा
6डेमोग्राफी इज डेस्टिनी    हिंदीकामाख्या नारायण सिंग; अंशुमन शेखर
7इकोज ऑफ द लास्ट शेल्टरहिंदीभरत अरोरा; राजेश भाटिया
8विनतेलगूप्रविण
9उलिद्दु संपीगे मात्राकन्नडअभिषेक
10निर्मांजली: द चंदिगड ऑफ मॅसीज नोविकी  इंग्रजीसुरज कुमार
11शिक्षामराठीअमित पाटकर
12नक्श – ए दौरकाश्मिरीबाबा तस्दुक हुसेन
13चांदोबामराठीनिपुण धर्माधिकारी
14आभाळवृक्षमराठीसंतोष डावखर
15अट्टपडीतमिळविजीष मणि
16सेव्ह द गॉडहिंदीनिरज कुमार मिश्रा
17अमित अटलहिंदीहितेष शंकर
18स्विच ऑफमल्याळमसंदिप फ्रान्सिस
19चलो इंडियन विथ एरिक जी मिझोरामइंग्रजीराजदीप चौधरी
20कथार कथा बंगाली धृतीश्री सरकारबंगालीधृतीश्री सरकार

इफ्फी च्या छत्राखाली 1978 मध्ये सादर करण्यात आलेला, इंडियन पॅनोरमा भारतीय चित्रपट आणि देशाच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचा सिनेमा कलेच्या माध्यमातून प्रचार करतो. हे वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आणि ना-नफा स्क्रीनिंगद्वारे चित्रपट कलेचा प्रचार करण्यासाठी समर्पित आहे. IFFI मध्ये त्यांच्या स्क्रिनिंगच्या पलीकडे, निवडक चित्रपट भारतातील आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, द्विपक्षीय सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमांतर्गत आयोजित भारतीय चित्रपट सप्ताह, सांस्कृतिक देवाणघेवाण प्रोटोकॉलच्या बाहेर विशेष भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सवांमध्ये सादर केले जाऊ शकतात.