Connect with us

गोवा खबर

आरोग्यसंपन्न विकसित भारत 2047 च्या उभारणीत विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : प्रल्हाद जोशी

Published

on

Spread the love

गोवा खबर:केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वात आज दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी महाविद्यालयात एक दिन, एक घंटा, एक साथ अर्थात एक दिवस, एक तास, एकमेकांच्या सोबतीने या उपक्रमांतर्गत श्रमदान आणि स्वच्छता मोहीम पार पडली. एक घंटा, एक साथ अर्थात एक दिवस, एक तास, सोबतीने हा उपक्रम देशभरात राबवला जात आहे. यावेळी प्रल्हाद जोशी यांनी एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत महाविद्यालय परिसरात एक रोपही लावले. यावेळी त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. स्वच्छतेचा थेट संबंध सार्वजनिक आरोग्य आणि कल्याणाशी असल्याचे ते म्हणाले. याअनुषंगानेच स्वच्छतेला आपल्या दैनंदिन सवयीचा भाग बनवण्यासाठी सामूहिक सहभाग महत्वाचा असतो ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

स्वच्छता, पर्यावरणीय जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाला प्रोत्साहन देण्यात विद्यार्थ्यांच्या भूमिका महत्वाची असल्याचेही त्यांनी या संवादात नमूद केले. शैक्षणिक संस्थांसोबतच आपापल्या घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. वैयक्तिक प्रयत्न सामूहिक कृतीला प्रेरणा देऊ शकतात आणि स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप मिळवून देऊ शकतात असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी स्वच्छताविषयक उपक्रमांसाठी दररोज किमान 30 मिनिटे योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

युवा वर्गातील शारीरिक सुदृढता आणि मैदानी खेळांचे महत्त्वही प्रल्हाद जोशी यांनी अधोरेखित केले. स्क्रीनवर घालवल्या जाणाऱ्या वेळेच्या बाबतीत योग्य समतोल साधून विद्यार्थ्यांनी क्रीडा विषयक उपक्रमांमध्येही सहभागी व्हायला हवे, मैदानावर वेळ घालवायला हवा असे प्रोत्साहनही त्यांनी दिले.

2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. जबाबदार नागरिकत्व आणि सक्रिय सहभागाच्या माध्यमातून या संकल्पाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याच्या तसेच, एक स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न भारत घडवण्यात विद्यार्थी हे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे ते म्हणाले.