Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love



गोवा खबर:राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यात पारंपरिकरित्या ‘चवथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थीच्या शुभप्रसंगी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “ गणेश चतुर्थी हा भक्ती, आनंद आणि एकोप्याचा सण आहे. विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून पूजले जाणारे भगवान श्री गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि विघ्नहर्ताचे प्रतीक आहेत. त्यांच्या आगमनाने आपली घरे आशा, आनंद आणि दैवी आशिर्वादांनी भरून जातात.”

चवथ हा एक अत्यंत प्रिय सण आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा आणि विधींच्या माध्यमातून कुटुंब आणि नातेवाईकांना एकत्र आणून साजरा केला जातो. चवथच्या वेळी कुटुंबातील लोक एकत्र येण्याने कौटुंबिक बंध दृढ करते, एकतेची आणि सामाजिक सलोख्याची भावना वाढीस लावतेआणि आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करण्यास मदत करतो.”

“गोव्याच्या चवथचे एक  विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे ‘माटोळी’, जो फळे, भाज्या, पाने, कंदमुळे आणि इतर नैसर्गिक उत्पादनांनी सुंदरपणे सजविलेला एक पारंपारिक मंडप आहे. हा उत्सव प्रेमाने तयार केलेल्या आणि गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या नेवऱ्या आणि मोदक यांसारख्या पारंपारिक मिठाईंसाठीही ओळखला जातो. या जपलेल्या परंपरा गोव्याचे निसर्गाशी असलेले घनिष्ठ नाते आणि त्याचा समृद्ध पाककला, कृषी व सांस्कृतिक वारशाकडे जोडलेले आहे. 

“हा आनंदोत्सव साजरा करीत असताना आपण निसर्गाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचीही जाणीव ठेवूया आणि पर्यावरणस्नेही व जबाबदार पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करूया. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध जैवविविधता आणि पर्यावरणीय वारसा यांचे संरक्षण करूया आणि सणाची परंपरा समृध्द करण्याबरोबरच ती येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील याची खात्री केली पाहिजे”,