Connect with us

गोवा खबर

३ ऑगस्टपासून चौथी अखिल गोवा आंतरशालेय तियात्र स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर : विद्यार्थ्यांमध्ये कोकणी तियात्रला प्रोत्साहन देण्यासाठी, गोवा तियात्र अकादमी अकादमीतर्फे ३ ते १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत रवींद्र भवन, मडगाव येथे चौथ्या अखिल गोवा आंतर-शालेय तियात्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ वाजता होईल. प्रख्यात डॉक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अर्नेस्टो रॉड्रिग्स हे प्रमुख पाहुणे असतील तर शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हे सन्माननीय पाहुणे असतील.तियात्रिस्ट अनिता फर्नांडिस (कॉम. अनिता) विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील. अकादमीचे अध्यक्ष अँथनी बार्बोसा आणि उपाध्यक्ष मार्कोस गोन्साल्विस हेही यावेळी उपस्थित राहतील.

राज्यभरातील सहा शाळा तियात्र स्पर्धेत तियात्र सादर करतील. कुजिरा सांताक्रूझ येथील रोझरी हायस्कूल ३ ऑगस्ट रोजी ‘दोषी कोण?’ हा तियात्र सादर करतील, त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी मडगाव येथील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल ‘ल्हान मूर्ती म्हान कीर्ती’ सादर करतील. कुडतरी येथील अवर लेडी ऑफ कार्मेल हायस्कूल ५ ऑगस्ट रोजी ‘उटाबशो’ सादर करतील, तर दिवाडी येथील अवर लेडी ऑफ दिवार हायस्कूल ६ ऑगस्ट रोजी ‘पिसोळी’ हा तियात्र सादर करतील. वेळ्ळी येथील सेंट झेवियर्स हायस्कूल ७ ऑगस्ट रोजी ‘पिकनिक’ हा तियात्र सादर करतील आणि दोना पावला येथील अवर लेडी ऑफ द रोझरी हायस्कूल १२ ऑगस्ट रोजी ‘बी तशे भात भट्ट’ हा तियात्र सादर करतील.

गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष अँथनी बार्बोसा यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि कलाप्रेमींना गोव्याच्या संस्कृतीच्या या उत्सवात सादरीकरण पाहण्यासाठी आणि तरुण कलाकारांना समर्थन देण्ण्याचे आवाहन केले आहे.