Connect with us

गोवा खबर

जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाने गोव्याने समर्पित लोकप्रतिनिधी गमावला : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर : ताळगावच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, ताळगावच्या पहिल्या महिला आमदार आणि सलग तीन वेळा आमदार म्हणून जेनिफर मोन्सेरात यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेची तसेच गोव्याची अत्यंत समर्पितपणे आणि संवेदनशीलतेने सेवा केली. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे त्यांनी म्हटले.

डॉ. सावंत यांनी जेनिफर मोन्सेरात यांच्या कुटुंबीयांप्रती आणि त्यांच्या असंख्य हितचिंतकांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो,” अशी प्रार्थनाही त्यांनी केली.