Connect with us

गोवा खबर

नितीन गडकरी यांनी घेतला ‘एनएचएलएमएल’ प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा; पायाभूत सुविधा उपक्रम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे एनएचएलएमएल – ‘नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड’ म्हणजेच राष्‍ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स  व्यवस्थापन मर्यादित’च्या आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी त्यांनी देशभरात विकसित केल्या जात असलेल्या बहुपर्यायी लॉजिस्टिक्स पार्क्स, ‘रोपवे’ म्हणजेच रज्जूमार्ग, इंटरमोडल – स्‍थानके आणि मार्गावरील सुविधा यांच्या प्रकल्प स्तरीय कामातील प्रगति जाणून घेतली.

या बैठकीमध्‍ये मंत्र्यांनी भविष्यासाठी सज्ज आणि एकात्मिक परिवहन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने या परिवर्तनकारी उपक्रमांच्या धोरणात्मक महत्त्वावर भर दिला. हे प्रकल्प बहुपर्यायी संपर्क व्यवस्था बळकट करतील. त्यामुळे नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील.  तसेच प्रादेशिक समतोल विकासाला चालना मिळेल.  भारताची लॉजिस्टिक्स क्षेत्रातील स्पर्धात्मक क्षमता वाढवतील, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्प अंमलबजावणीतील प्रमुख आव्हानांचेही मूल्यांकन केले आणि  हे अडथळे संबंधित सर्व घटकांनी प्राधान्याने दूर करून प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश दिले. लॉजिस्टिक्स प्रकल्प वेळेवर पूर्ण झाल्यामुळे  लॉजिस्टिक्स कार्यक्षमता सुधारेल, वाहतूक खर्च कमी होईल आणि सर्वांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सोयी-सुविधा उपलब्ध होतील. यामुळे ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना अधिक बळ मिळेल, असेही गडकरी यांनी सांगितले.