Connect with us

गोवा खबर

मायणा-कुडतरी पोलिसांकडून तरुणांना मारहाण; काँग्रेसची डीजीपींकडे कठोर कारवाईची मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात पाच युवकांसह एका अल्पवयीन मुलाला झालेल्या कथित मारहाण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अर्चित नाईक आणि महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी डीजीपींना या प्रकरणात ‘सुओ मोटो’ दखल घेऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले. या प्रकरणात दोन पोलीस निरीक्षकांसह पाच पोलिसांचे निलंबन ही केवळ दाखवू कारवाई असल्याचे सांगत ॲड. अमित पालेकर यांनी निष्पक्ष आणि कठोर चौकशीची गरज व्यक्त केली.

दरम्यान, म्हापसा येथील सॅम्युअल ब्रागांझा या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी गुन्हे शाखेकडे (क्राइम ब्रांच) सोपवावी आणि त्याच्याविरोधातील एफआयआर मागे घ्यावा, अशी मागणीही युवक काँग्रेसने केली आहे.