Connect with us

गोवा खबर

आमदार बोरकर यांच्याकडून आरजीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक; विश्वेश नाईक यांचा आरोप

Published

on

Spread the love

गोवा खबर : रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यावर आरोप केले आहेत. बोरकर यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्समध्ये हस्तक्षेप करून ते हॅक केल्याचा दावा नाईक यांनी व्हिडिओद्वारे केला आहे.

बोरकर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पक्षाच्या हितांविरोधात काम करत असून मूळ कार्यकारिणी सदस्यांना बाजूला सारून पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा बोरकर यांच्या कार्यालयातील लोकांनी आरजीची बदनामी केली होती, ज्याबाबत वारंवार सांगूनही त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. तसेच सांतआंद्रे मतदारसंघातील एका गाजत असलेल्या बंगल्याबाबत आमदार बोरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माहिती द्यावी, असे आव्हानही नाईक यांनी दिले असून लवकरच बोरकर यांना उघडे पाडणार असल्याचा इशारा दिला आहे.