Connect with us

गोवा खबर

१५ दिवसांत कदंबच्या ताफ्यात ३० नवीन बसेस

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी कदंब परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येत्या १५ दिवसांत ३० नवीन बसेस दाखल होणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी पणजी येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ताफ्यातील नवीन बसेसमुळे सध्याच्या सेवेचा विस्तार होऊन विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या बसेसची दुरुस्ती, रंगकाम आणि तांत्रिक तपासणी (ब्रेक प्रणाली, इंजिन, वायपर, लाइट्स आणि टायर) युद्धपातळीवर सुरू आहे.

चालकांना ओल्या रस्त्यांवर सुरक्षित वाहन चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी तांत्रिक पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नवीन ३० बसेसपैकी मोठा हिस्सा ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालवला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि दैनंदिन प्रवाशांना वेळेवर व नियमित बससेवा उपलब्ध होईल.