Connect with us

गोवा खबर

युनिटी मॉल परिसरात लावली एक हजार रोपटी

Published

on

Spread the love

गोवा खबर : चिंबल येथील रद्द झालेल्या प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाच्या जागेत चिंबलवासीयांनी रविवारी एक हजार रोपट्यांची लागवड केली. यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रम रविवारी ७ रोजी सुरू केला होता. त्यानुसार चिंबलवासीयांनी सुमारे ८५० रोपट्यांची लागवड केली होती. तसेच रविवारी १ हजार मिळून एकूण १,८५० रोपट्यांची लागवड केली आहे. उपक्रम सुरूच ठेवला जाईल, असेही ग्रामस्थांनी नमूद केले.

अजय खोलकर म्हणाले की, चिंबल येथील तयार तळीच्या ठिकाणी येणारे युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने रद्द केले. सदर परिसर हा अत्यंत पर्यावरण संवेदनशील आहे. तसेच आजच्या पिढीला औषधी, फळझाडांची माहिती त्यांना मिळावी, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला.

युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प सरकारने आम्ही केलेल्या आंदोलनानंतर चिंबल येथून रद्द केले. तसा लेखी आदेश फेब्रुवारी महिन्यात आम्हाला दिला होता. मात्र सहा महिने उलटले तरी या प्रकल्पाच्या ठिकाणी उभारलेले पत्र सरकारने काढलेले नाहीत. त्यासाठी आम्ही दहा दिवसांची मुदत त्यांना दिली होती. मात्र ही मुदत संपुष्टात आली तरी अजूनही पत्रे तिथेच आहेत. सदर विषयाचा आम्ही पाठपुरावा करणार आहे. मात्र सध्या तरी आंदोलनाबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याचे खोलकर यांनी सांगितले.