Connect with us

गोवा खबर

गोबेन-300 गोळ्या दर्जेदार; केवळ कॉम्प्रेशनमुळे पावडर होण्याची समस्या : एफडीए

Published

on

Spread the love

गोवा खबर : आमदार वेंझी व्हिएगस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर चर्चेत आलेल्या गॅबापेंटिन 300 मिग्रॅ (Goben-300) या औषधाबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) गोवा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एफडीएने जारी केलेल्या पत्रानुसार, गोवा मेडिकल कॉलेजच्या विनंतीनंतर Goben-300 या औषधाचे नमुने तपासणीसाठी गोवा अन्न व औषध प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर संबंधित औषध निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार (Standard Quality) असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एफडीएच्या म्हणण्यानुसार, औषधाच्या गुणवत्तेत कोणतीही त्रुटी आढळलेली नाही. मात्र, गोळ्यांच्या कॉम्प्रेशनमधील तांत्रिक समस्येमुळे काही गोळ्या पावडरसारख्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या संदर्भात भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी संबंधित पुरवठादाराला आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

एफडीएच्या अहवालानुसार, तपासणी केलेले दोन्ही बॅच नमुने गुणवत्तेच्या दृष्टीने समाधानकारक असून रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही चिंता नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.