Connect with us

गोवा खबर

गोवा न्यायव्यवस्थेला आणखी एक मानाचा तुरा; डॉ. शबनम शेख यांना पीएच.डी. पदवी

Published

on

Spread the love

गोवा खबर : दक्षिण गोवा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत राहिलेल्या आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शबनम शेख यांनी कायद्यातील डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

त्यांनी “गोवा राज्यातील वैवाहिक विवादांच्या सामाजिक-कायदेशीर पैलूंचा एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन करून २ मे २०२६ रोजी पीएच.डी. पदवी संपादन केली.

या संशोधन कार्यासाठी त्यांना व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय, गोवा येथील प्राचार्य डॉ. प्रा. शब्बीर अली, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथील कायदा विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ एम., तसेच व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयातील प्रा. किम रोचा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुटुंबीयांनीही या शैक्षणिक प्रवासात महत्त्वपूर्ण साथ दिली.

डॉ. एन. कोलवाळकर यांनी या संशोधनासाठी आंतरिक मार्गदर्शक म्हणून मोलाचे योगदान दिले.

डॉ. शबनम शेख यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल न्यायव्यवस्था, कायदा क्षेत्र आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.