गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील आरोग्य आणि पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी ‘डे-केअर कीमोथेरपी केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले.
आगामी काळात या रुग्णालयात अद्ययावत ‘कॅथ लॅब’, न्यूरो आणि ऑर्थोपेडिक सेटअप सुरू केला जाईल, अशी घोषणा राणे यांनी केली. तसेच रुग्णांना जलद सेवा मिळावी यासाठी सर्व १०८ रुग्णवाहिका या संवेशी जोडल्या जातील. रोटरी क्लब ऑफ पणजी आणि झायडस कंपनीच्या सहकार्याने हे प्रकल्प साकारण्यात आले असून जागतिक फॅटी लिव्हर दिनाचे औचित्य साधून ‘लिव्हर फॉरेव्हर’ मोहीमही सुरू करण्यात आली आहे. लवकरच राज्यात ‘सर्वायकल कॅन्सर’च्या तपासण्या आणि इतर वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.