Connect with us

गोवा खबर

राज्यभर एफडीएची तपासणी सुरूच राहणार : मंत्री राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : अन्न सुरक्षा सप्ताहानिमित्त अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात तीन महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी बांबोळी येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनमध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात या उपक्रमांचे उद्घाटन केले.

यामध्ये ‘न्यूट्रिशन एज्युकेशन सिरीज’, ‘ईट राईट कुलिनरी चॅलेंज’ आणि ‘स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ यांचा समावेश आहे. अन्न व्यवसायांनी कायद्याचे कठोर पालन करावे यासाठी राज्यभर नियमित तपासणी मोहीम सुरू राहील, असे राणे यांनी स्पष्ट केले.

अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन, संतुलित आहाराचा प्रसार आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील १ हजार स्ट्रीट फूड विक्रेत्यांना विशेष अन्न सुरक्षा प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना एफएसएसएआयचे फोस्टा अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच शाळा, महाविद्यालये आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये पोषण व आरोग्य विषयक कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.