Connect with us

गोवा खबर

ऐतिहासिक मळा झऱ्यातील प्रदूषणाची महापौरांकडून प्रत्यक्ष पाहणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी येथील ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या मळा झऱ्यामध्ये (फिनिक्स स्प्रिंग) गेल्या काही दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषणाची पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.

अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे झऱ्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आणि चिखल साचल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खंडित झाला आहे. यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून झऱ्यातील गाळ उपसून पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या झऱ्याची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.