Connect with us

गोवा खबर

फोंड्यात आमदार नसल्याने लोक माझ्याकडे येतात : सुदिन ढवळीकर

Published

on

Spread the love

गोवा खबर: फोंडा मतदारसंघात सध्या स्थानिक आमदार नसल्यामुळे अनेक नागरिक आपल्या विविध प्रशासकीय अडचणी आणि स्थानिक समस्या घेऊन थेट माझ्याकडे येत आहेत, असा दावा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत नागरिकांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासत असून, लोकांच्या शासकीय कामांना गती देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मगो पक्ष आपल्या समर्थकांसाठी फोंड्यात लवकरच पक्षाचे नवीन कार्यालय सुरू करणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मोठी मदत होईल, असे सांगतानाच आगामी काळात मगो स्थानिक पातळीवर अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत ढवळीकर यांनी दिले आहेत.