Connect with us

गोवा खबर

वाळपई सीएचसीमध्ये CSR अंतर्गत वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण; सत्तरीतील आरोग्य सेवांना बळ

Published

on

Spread the love

गोवा खबर : कम्युनिटी हेल्थ सेंटर, वाळपई येथे CSR उपक्रमांतर्गत वैद्यकीय उपकरणांच्या हस्तांतरण कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामुळे अल्ट्रासाऊंड, फिजिओथेरपी आणि प्रयोगशाळा सुविधांची भर पडणार असून सत्तरीतील नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, अधिक सक्षम आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे विश्वजित राणे यांनी सांगितले.

ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे CEO आणि Executive Director प्रणब घोष यांनी या उपक्रमात दिलेल्या सहकार्याबद्दल विश्वजित राणे यांनी आभार व्यक्त केले. अशा सामूहिक प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.